नारळी पौर्णिमेनिमित्त भाजप मालवणतर्फे २६ ऑगस्टला दांडी येथे स्पर्धा; महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन
मालवण,दि.२२ ऑगस्ट
भारतीय जनता पार्टी, मालवणच्या वतीने नारळी पौर्णिमेनिमित्त बुधवार, दि. २६ ऑगस्ट २०२६ रोजी सायंकाळी ३ वाजता दांडी-मालवण येथील रिक्षा स्टँड, दांडी शाळा येथे महिलांसाठी नारळ लढवणे स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
या स्पर्धेतील विजेत्या महिलेला प्रथम क्रमांकाचे रोख ५ हजार ५५५ रुपये, तर द्वितीय क्रमांकाच्या विजेत्या महिलेला ३ हजार ३३३ रुपये पारितोषिक देण्यात येणार आहे.
नारळी पौर्णिमेच्या पारंपरिक उत्सवाला महिलांच्या सहभागाची जोड देत आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत मोठ्या संख्येने महिलांनी सहभागी व्हावे, असे आवाहन मालवण नगरपालिकेच्या महिला व बालकल्याण सभापती तथा भाजप नगरसेविका सौ अन्वेषा आचरेकर आणि माजी नगरसेविका सौ सेजल परब यांनी केले आहे