मालवण : सातत्य, कष्ट आणि निर्व्यसनी जीवन यशाची गुरुकिल्ली – ॲड. दीपक अंधारी

शेअर करा

आवडीच्या क्षेत्रात झोकून देऊन काम करा; कट्टा वराडकर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन

मालवण,दि.१० जुलै


शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी सातत्य, कष्ट, जिद्द, मन लावून अभ्यास करण्याची तयारी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे निर्व्यसनी राहिल्यास जीवनात प्रत्येक गोष्ट साध्य होऊ शकते हे जाणून विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीचे क्षेत्र निवडताना त्यात झोकून देऊन देऊन काम करावे असे प्रतिपादन कणकवलीचे सुप्रसिद्ध वकील आणि कट्टा वराडकर हायस्कुलचे माजी विद्यार्थी ॲड. दीपक अंधारी यांनी येथे बोलताना केले

कट्टा येथील कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचालित वराडकर हायस्कूल आणि जूनियर कॉलेज, कट्टा, वराडकर इंग्लिश मीडियम स्कूल कट्टा आणि डॉ दादासाहेब वराडकर आर्ट्स, कॉमर्स महाविद्यालय कट्टा यांचा संयुक्त विद्यार्थी गुणगौरव कार्यक्रम माजी विद्यार्थी आणि सुप्रसिद्ध वकील ॲड. दीपक अंधारी यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला यावेळी व्यासपीठावर कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर खजिनदार श्याम पावसकर स्कूल कमिटी अध्यक्ष सुधीर वराडकर संचालक महेश वाईरकर प्रशालेच्या मुख्याध्यापिका देवयानी गावडे पर्यवेक्षक महेश भाट, इंग्लिश मीडियम स्कूलचे मुख्याध्यापक ऋषिकेश नाईक कॉलेजचे प्राचार्य ध्वजेंद्र मिराशी केंद्र प्रमुख गौरव नाईक आदी व इतर उपस्थित होते.

प्रारंभी सौ देवयानी गावडे यांनी उपस्थितांचे स्वागत करीत प्रास्तावित केले तर शिक्षक समिर चांदरकर यांनी प्रमुख पाहुण्यांची ओळख करून दिली

यावेळी बोलताना ऍड दीपक अंधारी यांनी शालेय जीवनात विद्यार्थ्यांनी अभ्यासात सातत्य ठेवले पाहिजे आपल्या सातत्याला प्रामाणिकतेची जोड दिली तर यशाचे शिखर गाठणे सुलभ होईल असेही ते म्हणाले

यावेळी संस्थेचे अध्यक्ष अजयराज वराडकर यांनी शंभर वर्षांपूर्वी योगात्मा काकासाहेब वराडकर यांनी या दशक्रोशीतील मुलांचा शैक्षणिक विकास व्हावा या उद्देशाने वराडकर हायस्कूलची स्थापना केली आज शंभर वर्षानंतर आपण काही शिकलो हे मागे वळून पाहताना ज्या शाळेने आपल्या ज्ञान दिले त्या शाळेची ऋण आपण विसरता कामा नये, शाळेविषयी आत्मीयता बाळगली पाहिजे समाजात कसे वागावे याचे संस्कार या शाळेने दिले या संस्कारातून आज विद्यार्थी घडत आहेत असेही ते म्हणाले

यावेळी दहावी, बारावी, शिष्यवृत्ती, स्पर्धात्मक परीक्षा, चित्रकला, संगीत तसेच महाविद्यालयीन परीक्षेतील कला आणि वाणिज्य विभागात यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचा गुणगौरव मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला यावेळी प्रमुख पाहुणे ऍड दीपक अंधारी यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला

शिक्षक श्री किसन हडलगेकर यांनी सूत्रसंचालन केले तर आभार प्राचार्य श्री ध्वजेंद्र मिराशी यांनी मानले

शेअर करा