श्री महापुरुष फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक-मालक मित्रमंडळाचा उपक्रम; सायंकाळी ६.३० वाजता भजनांचे आयोजन
मालवण,दि.१० ऑगस्ट
पवित्र श्रावण महिन्याचे औचित्य साधून ‘श्री महापुरुष फोवकांडा पिंपळ रिक्षा चालक मालक मित्रमंडळ’ यांच्या वतीने श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भव्य भजनांचे आयोजन करण्यात आले आहे. सर्व भजने सायंकाळी ६.३० वाजता सुरू होतील. तरी सर्व भजनप्रेमींनी या भक्तिमय कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन मंडळाच्या वतीने करण्यात आले आहे.
१७ ऑगस्ट रोजी महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, पिंगुळी, कुडाळ, बुवा प्रसाद पंढरी आंबडोसकर, पखवाज प्रथमेश राणे, तबला साईप्रसाद नाईक, २४ ऑगस्ट रोजी प.पु. राऊळ महाराज भजन मंडळ, पिंगुळी, कुडाळ, बुवा मयूर पिंगुळकर, पखवाज अमन सातार्डेकर, तबला ओंकार राऊळ, ३१ ऑगस्ट रोजी नादब्रह्म भजन मंडळ, कसाल, बुवा सुंदर मेस्त्री, पखवाज सिद्धेश मेस्त्री, तबला आयुष परब, ७ सप्टेंबर रोजी महापुरुष प्रासादिक भजन मंडळ, तुळस, बुवा पुरुषोत्तम परब, पखवाज पांडुरंग परब यांची भजने होणार आहे