मालवण : चौके येथे आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण संपन्न

शेअर करा

मालवण ,दि.०७ ऑगस्ट

चौके पंचक्रोशी शिक्षणप्रसारक मंडळ संचलित भ. ता. चव्हाण महाराष्ट्र माध्यमिक विद्यालय, चौके येथे आपत्ती व्यवस्थापनविषयक प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. एन.डी.आर.एफ. ५ बटालियन टीम ५/०, पुणे यांच्याकडून निरीक्षक राजेश कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाबाबत प्रशिक्षण देण्यात आले.

या कार्यक्रमात स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापिका सौ. गोसावी यांनी केले. या प्रशिक्षणादरम्यान विद्यार्थ्यांना विविध आपत्तींच्याप्रसंगी घ्यावयाची काळजी, सुरक्षिततेचे उपाय, आपत्कालीन परिस्थितीत बचावकार्य कसे करावे, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. आपत्ती व्यवस्थापनाची विविध प्रात्यक्षिके विद्यार्थ्यांना दाखविण्यात आली, या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या मनात आपत्ती व्यवस्थापनाविषयी जनजागृती करण्यात आली. या प्रशिक्षणाचा लाभ प्रशालेतील १८ मुली, १३ मुले, ७ शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी असे एकूण १११ विद्यार्थी व कर्मचारी यांनी घेतला. प्रशिक्षणामुळे विद्यार्थ्यांना आपत्कालीन परिस्थितीत प्रसंगावधान राखून योग्य उपाययोजना करण्याचे महत्त्व समजले.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल भ. ता. चव्हाण म. मा. विद्यालय, चौके यांच्यावतीने एन.डी.आर.एफ. ५ बटालियन टीम ५/०, पुणे यांच्या सर्व सदस्यांचे आभार मानण्यात आले.

शेअर करा