सावंतवाडी : बौद्ध महासभेच्या वतीने स्वातंत्र्यदिनी नगरपालिका कार्यालय समोर आमरण उपोषण…

शेअर करा

सावंतवाडी,दि.०४ ऑगस्ट

भारतीय बौद्ध महासभा शाखा सावंतवाडी च्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारक उभा?ण्यासाठी समाज मंदिर मॅजिक जागा घेऊन तेथे स्मारक उभारण्याचा संकल्प केला होता. मात्र त्या जमिनीत च्या जवळ नगरपालिकेने बहुउद्देशीय सभागृहाची इमारत उभारून त्या जमिनीत जाण्याचा येण्याचा मार्ग बंद केला आहे नगरपालिकेने त्यावेळी आश्वासन देऊ नही इमारत बांधकामा परवानगी देण्यास टोलवा, टोलवी केली असल्याने येत्या स्वातंत्र्यदिनी कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशारा बौद्ध महासभेच्या वतीने नगरपालिकेला दिला आहे . या संदर्भात 21 जुलै रोजी नगरपरिषद प्रशासनाला दिलेल्या निवेदनात भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी 22 ऑक्टोबर 1932 रोजी एका न्यायालयीन कामासाठी सावंतवाडी संस्थांना भेट दिली होती व भारताच्या इतिहासात सावंतवाडी संस्थांचे तत्कालीन राजे खेम सावंत भोसले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची दुर्मिळ भेट अजरामर ठरली आहे. याच भेटीदिवशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी राजापूर ते गोवा येथील कार्यकर्त्यांचा एक भव्य मेळावा याच ठिकाणी घेतला होता. या ऐतिहासिक भेटीला उजाळा देण्यासाठी नगरपालिकेने त्या स्थळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृती उद्यानही उभारले आहे ही कौतुकाची व स्पृहाणीय घटना हे ठरले आहे. या भेटीला उजाळा देण्यासाठी आम्ही समाज मंदिर परिसरात सुमारे 3.52 बिनशेती जमीन स्मारकासाठी 2004 मध्ये खरेदी केलेली आहे मात्र त्यानंतर नगरपरिषदेने त्याच जमिनी समोर बहुउद्देशीय सभागृहाची इमारत उभी केल्याने आमचा येण्या-जाण्याचा मार्गच बंद झाला आहे .यावेळी बांधकाम करताना समाजाने विरोध केल्यानंतर तत्कालीन नगराध्यक्ष व प्रशासनाने इमारती जवळून उजव्या बाजूने आपणाला येजा करण्यासाठी जागा सोडण्यात आली आहे तेथे राम उभा करून आपणाला मार्ग दिला जाईल असे आश्वासन दिले होते. मात्र त्यानंतर आम्ही इमारत बांधकाम करण्यासाठी अनेक वेळा प्रस्ताव सादर केले त्यानुसार गेल्यावर्षी पैसेही भरून घेण्यात आले मात्र आमच्या परवानगीचे पुढे काय झाले याबाबत काहीच आम्हाला लेखी कळविले गेलेले नाही. याबाबत विद्यमान नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष, मुख्य अधिकारी यांनाही प्रत्यक्ष भेटून या समस्याकडे आपले लक्ष वेधले असता 15 दिवसात मुदत आपण दिलेले होते मात्र चार महिने होऊनही अद्याप कार्यवाही नसल्याने आम्ही तालुक्यातील सर्व बौद्ध बांधव लोकशाही सनदशील मार्गाने येत्या स्वातंत्र्यदिनी आपल्या कार्यालयासमोर उपोषण करणार आहोत असा इशारा त्यांनी या निवेदनात दिला आहे.

शेअर करा