मालवण : आम. निलेश राणे यांच्या मागणीनुसार मालवण ग्रामीण रुग्णालयात स्त्रीरोगतज्ञ व बालरोगतज्ञ यांची नियुक्ती

शेअर करा

मालवण ,दि.११ जुलै

मालवण ग्रामीण रुग्णालयात गेली अनेक वर्षे बालरोग तज्ज्ञ व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर नसल्याने रुग्णांची गैरसोय होत असल्याने याबाबत आमदार निलेश राणे यांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांचे लक्ष वेधल्यावर सार्वजनिक आरोग्य विभागाकडून मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी बालरोगतज्ञ डॉ. वैशाली चव्हाण व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. प्रशांत बागडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आमदार निलेश राणे यांनी काल सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची भेट घेवून मतदारसंघातील आरोग्यस्थितीचा अहवाल सादर केला होता. १० लाखांपेक्षा जास्त पर्यटक ज्या मालवण शहराला भेट देतात त्या मालवण शहरातील ग्रामीण रुग्णालयाची परिस्थिती मांडत या रुग्णालयाला उपजिल्हारुग्णालय म्हणून दर्जा देत सुविधा देण्याची मागणी केली होती. त्यावर तत्काळ उपाययोजना करत डॉ. वैशाली चव्हाण- बालरोगतज्ञ व डॉ. प्रशांत बागडे- स्त्रीरोग तज्ञ यांची मालवण ग्रामीण रुग्णालयासाठी नियुक्ती करण्यात आली आहे.

शेअर करा