मालवण (प्रतिनिधी)
राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या परिसरातच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता विभागामार्फत मंगळवार दि.२९ सप्टेंबर रोजी राज्यभर ८०० हून अधिक ठिकाणी ‘रोजगार महाकुंभ महाराष्ट्र अंतर्गत रोजगार मेळावे’ आयोजित करण्यात येणार आहेत. या उपक्रमांतर्गत मालवण तालुक्याचा रोजगार मेळावा हा दि. २९ सप्टेंबर रोजी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण-कुंभारमाठ या ठिकाणी सकाळी १० वा. आयोजित करण्यात आलेला आहे.
या रोजगार मेळाव्याला Hotel Ruchira, Adeco MNC, Accurate Services, Maharaja Executive, DSP Autopro, Raunak Enterprise, Sai Project (One Stop). Hotel Blue Sea या आस्थापना सहभागी होणार आहेत. या आस्थापनांमध्ये SSC, HSC, Hotel Management, Diploma ITI, Graduate, Engineering शैक्षणिक पात्रतेच्या उमेदवारांच्या रिक्त जागा भरावयाच्या आहेत.
तरी या रोजगार मेळाव्यासाठी इच्छूक व पात्र उमेदवारांनी दिलेल्या QR कोडच्या माध्यमातून नोंदणी करावयाची आहे. रोजगार मेळाव्यासाठी ऑनलाईन नोंदणी करताना काही अडचण असल्यास शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, मालवण यांच्या 02365 – 299216 या क्रमांकवर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.