मालवण : कट्टा महाविद्यालयात गुरु -शिष्य उज्वल परंपरेला वंदन

शेअर करा

मुंबई विद्यापीठ अंतर्गत कट्टा

मालवण,दि.०७ ऑगस्ट

पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ.दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय कट्टा येथील मराठी विभागाच्या वतीने गुरु पौर्णिमेनिमित्त बुधवार दिनांक 29 जुलै २०२६ रोजी विशेष भितीपत्रक अनावरण व प्रकाशन सोहळा संपन्न झाला .गुरु पौर्णिमा दिनानिमित्त भारतीय संस्कृतीला गुरु शिष्य परंपरेचा गौरव करण्यासाठी तसेच विद्यार्थ्यांमध्ये कृतज्ञता, आदरभाव ,आणि संस्कार मूल्ये वृद्धिंगत करण्याच्या उद्देशाने गुरु -शिष्य उज्वल परंपरा विशेष भितीपत्रकाचे लेखन आयोजित केले होते.यामध्ये विद्यार्थी ,प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला .भितीपत्रकाचे अनावरण महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय ध्वजेंद्र मिराशी यांच्या हस्ते करण्यात आले.
या कार्यक्रमाप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य माननीय ध्वजेंद्र मिराशी उपप्राचार्य माननीय रवींद्र गावडे, प्राध्यापक, कर्मचारी उपस्थित होते या कार्यक्रमासाठी मराठी विभाग प्रमुख प्राध्यापक रवींद्र गावडे यांनी विशेष प्रयत्न केले

शेअर करा