मालवण : लायन्स क्लब मालवणतर्फे देऊळवाडा शाळेतील मुलांना दप्तर व पौष्टिक खाऊ वाटप

शेअर करा

मालवण ,दि.१७ जुलै

लायन्स क्लब मालवण यांच्या वतीने मालवण शहरातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मालवण देऊळवाडा या शाळेतील पहिली ते पाचवीच्या २७ विद्यार्थ्यांना शालेय दप्तर आणि पौष्टिक खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी लायन्स क्लब मालवणचे अध्यक्ष सहदेव बापर्डेकर, सेक्रेटरी पूनम चव्हाण, खजिनदार राधिका मोडकर, झोन चेअरमन अनुष्का चव्हाण, सौ. जयश्री हडकर, रुजारिओ पिंटो, गणेश प्रभुलीकर, नंदिनी गांवकर, दीक्षा गांवकर, मनीषा गांवकर, फॅनी फर्नाडिस यांसह लायन्स क्लबचे पदाधिकारी उपस्थित होते.

लायन्स क्लबकडून शालेय स्तरावर विद्यार्थ्यांसाठी हा सेवाभावी उपक्रम विद्यार्थ्यासाठी राबविण्यात आल्याबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका सौ. श्वेता यादव, शिक्षिका सौ. अदिती ठाकूर, प्रांजल चव्हाण यांनी लायन्स क्लब पदाधिकाऱ्यांचे आभार व्यक्त केले.

शेअर करा