मालवण,दि.१० जुलै*
दहावी आणि बारावी परीक्षा २०२५-२६ मध्ये उत्तीर्ण झालेले मालवण तालुक्यातील सर्व गाबित विद्यार्थी आणि विद्यार्थीनींचा गुणगौरव समारंभ दि. १२ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता मालवण धुरीवाडा येथील संस्कार हॉलमध्ये आयोजित करण्यात आला आहे.
आरोग्य क्षेत्रातील महत्वपूर्ण योगदानाबद्दल आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरविले गेलेले डॉ. रत्नाकर कोयंडे यांच्या अध्यक्षतेखाली तर प्रमुख पाहुणे प्रख्यात इंजिनिअर लक्ष्मीकांत खोबरेकर यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडणार आहे.
यावेळी डाॕ. कोयंडे यांचा गाबीत समाजाच्या वतीने सत्कार केला जाणार आहे. तसेच मालवण नगरपरिषदेत नगरसेवक/नगरसेविका म्हणून कार्यरत असलेल्या गाबीत समाजातील लोकप्रतिनिधींचा सत्कार केला जाणार आहे. तरी गाबीत समाज बांधव भगीनींनी या दोन्ही गौरव सोहळ्यांना मोठ्या संख्येने उपस्थित राहवे. तसेच दहावी बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांनी आपल्या गुणपत्रिकेच्या साक्षांकित प्रती आपआपल्या भागातील मालवण गाबित समाज कार्यकारिणी सदस्यांकडे सादर कराव्यात, असे आवाहन गाबीत समाज मालवण तालुकाध्यक्ष डॉ. प्रमोद कोळंबकर यांनी केले आहे.