मालवण नगरपरिषदेची विशेष स्वच्छता मोहीम; रेवतळे, आदर्शनगरसह तीन परिसरांची साफसफाई

शेअर करा

आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली सकाळी ७ ते ९ दरम्यान मोहीम; शहर स्वच्छतेसाठी नागरिकांनाही सहकार्याचे आवाहनमालवण दि प्रतिनिधी

मालवण,दि.२७ जून

मालवण नगरपरिषदेच्या आरोग्य विभागामार्फत शहरातील रेवतळे, आदर्शनगर व रेडकर हॉस्पिटल रोड या परिसरात आज शनिवारी सकाळी ७ ते ९ या वेळेत विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. ही स्वच्छता मोहीम आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

यावेळी नगरसेविका सौ. अनिता गिरकर तसेच अन्य मान्यवर सदस्य उपस्थित होते. या मोहिमेत आरोग्य विभागाचे अधिकारी, कर्मचारी तसेच सफाई कर्मचाऱ्यांनी परिसरातील कचरा, झाडझुडपे व इतर अस्वच्छता दूर करून स्वच्छता केली. या उपक्रमास स्थानिक नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत स्वच्छता अभियानात सहभाग नोंदविला.

यापुढेही शहरातील प्रत्येक विभागात अशाच प्रकारे विशेष स्वच्छता मोहिमा राबविण्याचे नियोजन आरोग्य सभापती सौ. पूनम चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले असून, शहर स्वच्छ, सुंदर व निरोगी ठेवण्यासाठी नागरिकांनीही सहकार्य करावे, असे आवाहन मालवण नगरपरिषदेच्या वतीने करण्यात आले.

शेअर करा