अनिल कांदळकर यांची अध्यक्षपदी सलग २०वर्षांची हॅटट्रिक
मालवण,दि.२४ ऑक्टोंबर
संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात शैक्षणिक गुणवत्तेत आघाडीवर असलेल्या आणि शंभर टक्के निकालाची परंपरा असलेल्या पोईप येथील सौ.इंदिराबाई द.वर्दम हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज च्या पोईप सर्कल एज्युकेशन सोसायटीच्या कार्यकारिणीची निवड बिनविरोध झाली असून या मध्ये अध्यक्ष पदी अनिलभाई कांदळकर यांची सलग चार टर्म म्हणजे वीस वर्षे निवड झाली आहे.तर नुतन कार्यकारी मंडळाचे उपाध्यक्षपदी गोपीनाथ पालव, सचिव विलास माधव, सहसचिव महेश पालव, खजिनदार महेंद्र पालव, संचालक सत्यवान पालव, नामदेव पुजारे, सुरेश नेरुरकर, महेश माधव, विश्वनाथ नाईक, मोहन घाडीगांवकर तर सल्लागार म्हणून श्री सुहास पालव, श्री नितीन नाईक यांची निवड बिनविरोध झाली आहे.
या निवडीनंतर नवनिर्वाचित अध्यक्ष अनिलभाई कांदळकर यांचे सर्वांनी अभिनंदन केले तसेच इतर सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी संचालक सल्लागार यांचेही अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या
यावेळी संस्थाध्यक्ष अनिलभाई कांदळकर यांच्या गेल्या २०वर्षातिल शैक्षणिक कार्य कर्तुत्वाला उजाळा देत त्यांनी संस्थेच्या माध्यमातून प्रशालेच्या सर्वांगीण प्रगतीसाठी केलेले परीश्रम, आपल्या विवेक बुद्धीने प्रशालेची सुसज्ज इमारत, भव्य सभागृह,, दर्जेदार कला क्रीडा सुविधा, गुणवत्ता धारक शिक्षक वृंद आणि संपूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यात या प्रशालेचे झालेले नावलौकिक याचे सारे श्रेय अनिलभाई कांदळकर यांनाच आहे असे गौरवोद्गार उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले आहेत.नुतन कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष अनिलभाई कांदळकर, उपाध्यक्ष गोपीनाथ पालव यांच्या सह सर्व पदाधिकारी, संचालक सल्लागार यांचेही प्रशालेचे प्राचार्य विकास कुंभार यांनी अभिनंदन करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.