मालवण तालुका भाजपातर्फे विविध सेवा उपक्रमांचे आयोजन; पालकमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक बांधिलकीचा संदेश.
मालवण,दि.२३ जून
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री तथा सिंधुदुर्ग पालकमंत्री नितेश राणे यांचा वाढदिवस मालवण तालुका भाजपाच्या वतीने धार्मिक तसेच विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा केला जात आहे.
श्री देव रामेश्वर मंदिर कांदळगाव येथे अभिषेक व धार्मिक कार्यक्रम करण्यात आले. यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अशोक सावंत, तालुकाध्यक्ष धोंडी चिंदरकर, जिल्हा परिषद सदस्य क्षमा हडकर, महेश मांजरेकर, संतोष पारकर, प्रकाश तोंडवळकर, विजय निकम, मंगेश चव्हाण, संदीप हडकर, बाळू राणे, सत्यवान लोके यांसह अन्य भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.
भारतीय जनता पार्टी पदाधिकारी कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत तालुक्यात विविध सामाजिक उपक्रम राबवण्यात येत आहेत.