मालवण ,दि. १६ ऑगस्ट
शिष्यवृत्ती परीक्षेत एकाच कुटुंबातील भाऊ-बहिणीने प्रत्येकी २४२ गुण मिळवत उल्लेखनीय यश संपादन केले आहे. कोळंब कातवड शाळेचे मुख्याध्यापक नारायण केशव पराडकर व मालवण पंचायत समिती ग्रामपंचायत विभागातील वरिष्ठ सहाय्यक वर्षा नारायण पराडकर यांचा मुलगा आराध्य याने इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत १९ वा, तर मालवण तालुक्यात द्वितीय क्रमांक पटकावला. तसेच
मुलगी लेईशा हिनेही इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत
शहरी सर्वसाधारण गटाच्या जिल्हा गुणवत्ता यादीत १३ वा, तर मालवण तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळविला आहे
इयत्ता चौथीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश संपादन करणारा आराध्य पराडकर हा जि. प. शाळा रेवतळेचा विध्यार्थी असून इयत्ता सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळविणारी लेईशा ही अ. शि. दे. टोपीवाला हायस्कूल मालवणची विध्यार्थिनी आहे
कुमार आराध्य याला जिल्हा परिषद रेवतळे शाळेचे मुख्याध्यापक देविदास प्रभूगावकर, उपशिक्षक महादेव घोडके यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच लेइशा हिला टोपीवाला हायस्कूल च्या शिक्षक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.
एकाच कुटुंबातील दोन्ही भावंडांनी शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्तापूर्ण यश मिळविल्याने पराडकर कुटुंबाच्या शैक्षणिक यशात मानाचा तुरा खोवला गेला आहे. त्यांच्या या यशाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
या यशाबद्दल केंद्रप्रमुख गुरुनाथ ताम्हणकर यांनी शाळेत जाऊन दोन्ही विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. तसेच गटविकास अधिकारी परागिणी पाटील, गटशिक्षणाधिकारी अजिंक्य कोतमिरे सहाय्यक गटविकास अधिकारी पांडुरंग सावंत, पंचायत समिती सभापती प्रज्ञा चव्हाण, उपसभापती श्याम झाड, सदस्य दीपक चव्हाण, माजी गटविकास अधिकारी प्रफुल वालावलकर, गडचिरोली गटविकास अधिकारी आत्मज मोरे, माजी सहाय्यक गटविकास अधिकारी संजय गोसावी व कोळंब केंद्रप्रमुख प्रशांत पारकर यांच्यासह शिक्षक व मित्रपरिवाराने आराध्य व लेईशाचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.