मालवण ,दि. १८ ऑगस्ट
मालवण येथील भंडारी एज्युकेशन सोसायटी कनिष्ठ महाविद्यालय येथे स्वातंत्र्य दिनानिमित्त देशभक्तीपर समूहगीत गायन स्पर्धा संपन्न झाली. या स्पर्धेत बारावी वाणिज्य संघाने प्रथम क्रमांक पटकाविला. तर अकरावी कला संघाने द्वितीय क्रमांक आणि अकरावी वाणिज्य संघाने तृतीय क्रमांक मिळविला.
या स्पर्धेत इयत्ता अकरावी व बारावीतील कला, वाणिज्य आणि विज्ञान शाखेचे एकूण आठ संघ सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर गीतांचे सादरीकरण करत उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्या संघांना रोख रक्कमेची बक्षिसे देऊन गौरविण्यात आले.
या स्पर्धेचे परीक्षण प्रा. प्राजक्ता परब यांनी केले. स्पर्धेचे नियोजन व सूत्रसंचालन मोरेश्वर गोसावी यांनी केले. यावेळी प्राचार्य आर. डी. बनसोडे, प्रा. पवन बांदेकर, प्रा. दळवी, प्रा. सावंत, प्रा. वाक्कर, सौ. चव्हाण, पूनम मेस्त्री, देवेंद्र चव्हाण यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.