मालवण : युवा महोत्सवात प्राची परबचे यश

शेअर करा

कथाकथन (मराठी) प्रकारात द्वितीय क्रमांक; मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड

मालवण,दि. १९ ऑगस्ट

मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी विकास विभागातर्फे आयोजित ५९ वा युवा महोत्सव शनिवार, दि. ८ ऑगस्ट २०२६ रोजी यशवंतराव भोसले इन्स्टिट्यूट, सावंतवाडी येथे उत्साहात संपन्न झाला. या महोत्सवात कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळ, कट्टा संचलित डॉ. दादासाहेब वराडकर कला व वाणिज्य महाविद्यालय, कट्टा येथील विद्यार्थ्यांनी विविध कला, साहित्य व सांस्कृतिक प्रकारांत उत्स्फूर्त सहभाग नोंदवून उल्लेखनीय कामगिरी केली.

कथाकथन (मराठी) या कला प्रकारात महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राची संभाजी परब हिने उत्कृष्ट सादरीकरण करत द्वितीय क्रमांक प्राप्त केला. या उल्लेखनीय कामगिरीमुळे तिची मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे. प्राचीला महाविद्यालयाच्या प्राध्यापिका व्ही. आर. पालव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.

या युवा महोत्सवात महाविद्यालयाने मराठी वक्तृत्व, हिंदी वक्तृत्व, मराठी कथाकथन, सुगम गायन, नाट्यसंगीत, मराठी एकपात्री, मूकाभिनय, रांगोळी, मातीकाम, पोस्टर मेकिंग आणि ऑन-द-स्पॉट पेंटिंग अशा एकूण ११ स्पर्धा प्रकारांत सहभाग नोंदविला.

प्राची परब हिच्या यशाबद्दल संस्था अध्यक्ष, सचिव व सर्व पदाधिकारी तसेच महाविद्यालय विकास समिती अध्यक्ष व सर्व पदाधिकारी व महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. डी. व्ही. मिराशी, उपप्राचार्य श्री. आर. जी. गावडे, सर्व प्राध्यापकवर्ग व प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी तिचे अभिनंदन करून मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीसाठी शुभेच्छा दिल्या.

यावेळी उपप्राचार्य श्री. आर. जी. गावडे, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. के. व्ही. खानोलकर, प्रा. एस. व्ही. कुंभार, प्रा. एम. एन. कविटकर, प्रा. एस. एस. नेरुरकर तसेच लिपिक प्रतीक लोके उपस्थित होते.

प्राची परब हिच्या या यशामुळे महाविद्यालयाच्या सांस्कृतिक क्षेत्रातील लौकिकात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला असून, मुंबई विद्यापीठाच्या अंतिम फेरीत ती कशी कामगिरी बजावते, याकडे महाविद्यालयासह परिसरातील कला व सांस्कृतिक क्षेत्राचे लक्ष लागले आहे

शेअर करा