सेवा संकल्प अभियानांतर्गत सिंधुदुर्गातील समतादूतांचा उपक्रम; ओरोस बुद्रुक सिद्धार्थनगरसह विविध ठिकाणी नागरिकांना योजनांची माहिती
मालवण,दि.१८ ऑक्टोंबर
समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग व बार्टी यांच्या संयुक्त विद्यमाने सेवा संकल्प अभियानाअंतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील समतादूतांनी पथनाट्याच्या माध्यमातून समाज कल्याण व बार्टीच्या योजनांचा प्रचार आणि प्रसार केला.
समतादूतांनी ओरोस बुद्रुक सिद्धार्थ नगर, कसाल बस स्थानक ओरोस बस स्थानक येथे पथनाट्याच्या माध्यमातून नागरिकांना सामाजिक न्याय विभाग व बार्टीच्या विविध योजनांची माहिती दिली. याप्रसंगी बार्टीचे प्रभारी प्रकल्प अधिकारी विजय कदम, समतादूत सुदीप कांबळे, संग्राम कासले, सगुण जाधव, सुजित जाधव, राजू दिनदयाळ, सुहास मोचेमाडकर आदी उपस्थित होते. समाज कल्याण विभाग सिंधुदुर्ग चे सहाय्यक आयुक्त संतोष चिकने व बार्टीचे विभाग प्रमुख डॉ. बबन जोगदंड यांच्या मार्गदर्शनाखाली सदरचा कार्यक्रम राबविण्यात आला.