मालवण : कोळंब येथील गोपाळकृष्ण मंदिरात श्रावणी भजन महोत्सव

शेअर करा

मालवण,दि.०७ ऑगस्ट

कोळंब-भटवाडी येथील श्री गोपाळकृष्ण मंदिरात श्रावणी भजन महोत्सव -२०२६ साजरा करण्यात येणार आहे. श्रावणातील प्रत्येक सोमवार, श्रावणी एकादशी आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त नामांकित भजन मंडळांचे भजन, कीर्तन व धार्मिक कार्यक्रम आयोजित केले आहेत.

यामध्ये सोमवार दि. १७ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वा. श्री ब्राह्मणदेव प्रासादिक भजन मंडळ, न्हिवे (बुवा-राजू दळवी) यांच्या भजनाने होणार आहे. दि. २३ ऑगस्टला श्री ग्रामदेव प्रासादिक भजन मंडळ, कांदळगाव (बुवा – प्रवीण परुळेकर, पखवाज – मंथन पाटकर), दि. २४ रोजी श्री बलभीम प्रासादिक भजन मंडळ, सर्जेकोट (बुवा – रोहित आडकर, पखवाज ताता आचरेकर), दि. ३१ ऑगस्ट श्री बाळ गोपाळ प्रासादिक भजन मंडळ, आचरा वरची चावडी (बुवा मंदार आचरेकर), दि. ४ सप्टेंबर रोजी सायं. ७ वा. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त श्री भूतनाथ प्रासादिक भजन मंडळ, वायरी (बुवा – भालचंद्र केळुसकर, पखवाज-किरण कुर्लेकर), रात्री १० वा. विवेक वायंगणकर यांचे कीर्तन, रात्री १२ वा. श्रीकृष्ण जन्मोत्सव साजरा करण्यात येणार आहे. दि. ७ सप्टेंबरला श्री लिंगनाथ प्रासादिक भजन मंडळ पोखरण (बुवा – समीर कदम) यांचे भजन होणार आहे.

शेअर करा