तालुकानिहाय बैठकांचे होणार आयोजन
मालवण ,दि. १७ ऑगस्ट
सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेस कमिटीच्या जिल्हा कार्यकारिणी पदाधिकारी व तालुकाध्यक्षांची आढावा बैठक रविवारी कुडाळ येथील एमआयडीसी रेस्ट हाऊस येथे जिल्हाध्यक्ष अरविंद नामदेव मोंडकर यांच्या उपस्थितीत संपन्न झाली. आगामी काळातील संघटनात्मक विस्तार, मतदार यादीतील बाबी आणि तालुकानिहाय संघटन मजबूत करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी जिल्ह्यात सुरू असलेल्या मतदार यादीच्या SIR व BLO-2 संदर्भातील कामाचा आढावा घेण्यात आला. तसेच तालुका कार्यकारिणीचा विस्तार, शहराध्यक्षांच्या निवडी व विविध संघटनात्मक नियुक्त्यांबाबत चर्चा करण्यात आली.
जिल्ह्यातील विविध सेल व विभागांचे अध्यक्ष तसेच कमिट्यांच्या नियुक्त्यांसाठी इच्छुकांकडून नावे व अर्ज मागविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याचबरोबर जिल्हा कार्यकारिणीतील वाढीव पदांवर इच्छुक पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीबाबतही चर्चा झाली. जिल्हा उपाध्यक्ष, सरचिटणीस व सचिव यांची तालुका समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली. संघटनात्मक बांधणीला अधिक गती देण्यासाठी येत्या पंधरवड्यात जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये आढावा बैठका घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
तालुकानिहाय बैठकांचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :- वेंगुर्ला : शुक्रवार, २१ ऑगस्ट, सकाळी १०.३० वा. समन्वयक : विजय प्रभू, डॉ. विवेक रायकर, देवानंद लुडबे. कुडाळ : सोमवार, २४ ऑगस्ट, सकाळी १०.३० वा. समन्वयक : विजय प्रभू, केतनकुमार गावडे. देवगड : मंगळवार, २५ ऑगस्ट सकाळी १०.३० वा. समन्वयक : प्रवीण वरुणकर, अॅड. राजन यादव. कणकवली : शनिवार, २९ ऑगस्ट सकाळी १०.३० वा. समन्वयक : अनिल डेंगवेकर, अॅड. राजन यादव. वैभववाडी : रविवार, ३० ऑगस्ट, दुपारी ३.०० वा. समन्वयक : अनिल डेंगवेकर, प्रवीण वरुणकर. सावंतवाडी : मंगळवार, १ सप्टेंबर सकाळी १०.३० वा. समन्वयक : नागेश मौर्ये, सुभाष दळवी. दोडामार्ग : बुधवार, २ सप्टेंबर | सकाळी ११ वा. समन्वयक : वासुदेव नाईक, देवानंद लुडबे. मालवण : गुरुवार, ३ सप्टेंबर, सकाळी १०.३० वा. समन्वयक : मेघनाद धुरी, राजेंद्र मसुरकर.
या तालुकास्तरीय बैठकांना माजी जिल्हाध्यक्ष, माजी खासदार-आमदार, माजी लोकप्रतिनिधी व उमेदवार, प्रांतिक सदस्य तसेच विविध सेल व विभागांचे अध्यक्ष व संयोजक कायम निमंत्रित राहणार आहेत. यामध्ये NSUI, युवक काँग्रेस, महिला काँग्रेस, सेवादल, ओबीसी, अनुसूचित जाती-जमाती तसेच इतर विभागांचा समावेश आहे. काँग्रेसची संघटनात्मक ताकद वाढविणे, पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये समन्वय वाढविणे आणि आगामी काळातील पक्षाच्या कामकाजाला अधिक व्यापक स्वरूप देणे या उद्देशाने बैठकीत विविध विषयांवर चर्चा व विचारविनिमय करण्यात आला.
या बैठकीस जिल्हाध्यक्ष अरविंद मोंडकर, माजी जिल्हाध्यक्ष विलास गावडे, प्रकाश जैतापकर, धुरी, उपाध्यक्ष तथा जिल्हा बँक संचालक मेघनाद धुरी, विद्याप्रसाद बांदेकर, नागेश मौर्ये, विजय प्रभू, जिल्हा सरचिटणीस रवींद्र म्हापसेकर, देवानंद लुडबे, प्रवीण वरुणकर, केतनकुमार गावडे, जिल्हा सचिव अॅड. राजन यादव, चंद्रसेन सावंत, मधुकर लुडबे, तसेच तालुकाध्यक्ष जेम्स फर्नांडिस, गुणाजी गवस, भालचंद्र जाधव, बाबाजी पांचाळ, सुधीर चांदेलकर, नंदकिशोर प्रसादी, अमृत राऊळ, पराग माणगावकर यांच्यासह इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.