मालवण: कुंभारमाठ कातकरी वस्ती येथे सोलार हायमास्ट टॉवरची उभारणी

शेअर करा

मालवण,दि.१७ जुलै

ठक्कर बाप्पा आदिवासी वस्ती सुधार योजना सन २०२५-२०२६ अंतर्गत ग्रामपंचायत कुंभारमाठ कार्यक्षेत्रातील कातकरी वस्ती येथे रुपये ५ लाख निधीतुन मंजूर सोलार हायमास्ट टॉवरची उभारणी करण्यात आली आहे. याबाबत ग्रामपंचायत कुंभारमाठच्या वतीने सरपंच सौ. पुनम मनोज वाटेगावकर यांनी आमदार निलेश राणे तसेच खासदार नारायण राणे व पालकमंत्री नितेश राणे यांचे आभार व्यक्त केले आहेत.

आमदार निलेश राणे यांनी ग्रामपंचायतच्या मागण्यांची नेहमीच दखल घेऊन ग्रामीण तसेच आदिवासी भागाच्या विकासाला प्राधान्य दिले आहे. कुंभारमाठ ग्रामपंचायत क्षेत्रातील कातकरी समाजाच्या गरजा लक्षात घेऊन यापूर्वीही त्यांचे बहुमोल योगदान राहिले आहे. त्यांच्या पाठपुराव्यामुळे आणि विकासाविषयीच्या सकारात्मक भूमिकेमुळे निधी मंजूर होऊन कातकरी वस्तीमध्ये सोलार हायमास्ट उभारण्यात आला आहे. या कामामुळे परिसर प्रकाशमान होण्यास व सुरक्षितता वाढण्यास, नागरिकांना रात्रीच्या वेळी अधिक सोयी उपलब्ध होण्यास आणि वस्तीच्या विकासाला नवी दिशा मिळण्यास निश्चितच मदत होईल, असे सरपंच सौ. वाटेगावकर यांनी सांगितले.

शेअर करा