मालवण : कुणकवळे येथे १५ रोजी संग्राम कासले यांचे प्रवचन

शेअर करा

मालवण,दि.१० ऑगस्ट

भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण अंतर्गत संस्कार विभागाच्या वतीने वर्षावास धम्म प्रवचन मालिका २०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. धम्मचक्र प्रवचन मालेचे चौथे पुष्प शनिवार दि. १५ ऑगस्ट रोजी गाव शाखा कुणकवळे येथे सायंकाळी ७ वाजता प्रचार व पर्यटन तालुका उपाध्यक्ष व बार्टीचे समतादूत संग्राम कासले हे गुंफणार आहेत. संग्राम कासले यांचे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय स्वातंत्र्य या विषयावर प्रवचन होणार आहे.

तरी सर्व पदाधिकारी, महिला शाखेचे पदाधिकारी, केंद्रीय शिक्षक – शिक्षिका, बौध्दाचार्य, समता सैनिक, सर्व गाव शाखा अध्यक्ष,पदाधिकारी, उपासक व उपासिका आपण सर्वांनी धम्म श्रवण करण्यासाठी पांढऱ्या शुभ्र पोशाखात व वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा मालवण यांच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा