मालवण : भातपीक नुकसानीची तहसीलदार गणेश लव्हे यांच्याकडून पाहणी

शेअर करा

मालवण,दि.२६ सप्टेंबर

मालवण तालुक्यातील कोळंब मंडळ विभागातील विविध गावांमध्ये झालेल्या भातपिकाच्या नुकसानीची तहसीलदार गणेश लव्हे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन पाहणी केली. अतिवृष्टी व प्रतिकूल हवामानामुळे भातशेतीचे नुकसान झालेल्या भागांची त्यांनी पाहणी करून शेतकऱ्यांकडून नुकसानीची माहिती घेतली.

यावेळी संबंधित महसूल अधिकारी मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, तालुका कृषी अधिकारी अमोल करंदीकर, ग्राम महसूल अधिकारी सुप्रिया शिवलकर, सरपंच सिया धुरी, कृषी सेवक विवेक रंगे व ई पीक पाहणी सहाय्यक व शेतकरी आणि कर्मचारी उपस्थित होते. शेतकऱ्यांनी भातपिकाचे झालेले नुकसान, पाण्यामुळे पिकांची झालेली पडझड तसेच काढणीच्या अवस्थेतील भाताचे झालेले नुकसान याबाबत तहसीलदार लव्हे यांना माहिती दिली. तहसीलदार लव्हे यांनी प्रत्यक्ष शेतावर जाऊन परिस्थितीची पाहणी करताना नुकसानीची वस्तुनिष्ठ नोंद घेण्याच्या सूचना संबंधित यंत्रणेला दिल्या. शासनाच्या निकषानुसार पंचनामे व आवश्यक कार्यवाही करण्याबाबतही त्यांनी मार्गदर्शन केले.

शेअर करा