मालवण टोपीवाला हायस्कूलचे एनएमएमएस शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश

शेअर करा

मालवण,दि १७ जुलै

राष्ट्रीय आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक शिष्यवृत्ती योजना (एनएमएमएस) परीक्षेत मालवण येथील टोपीवाला हायस्कुलच्या अनन्या अनिल पाटकर आणि मानसी संतोष बांदिवडेकर या दोन विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती प्राप्त केली आहे.

या विद्यार्थिनींना शिक्षक श्री. मिलिंद शिरोडकर, सौ. दर्शना सामंत, सौ. मयुरा भिसे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले. मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांनी या विद्यार्थिनींचे व मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.

शेअर करा