तहसीलदार गणेश लव्हे यांनी पुष्पचक्र अर्पण करून दिली मानवंदना; ग्रामस्थांसह मान्यवरांची उपस्थिती
मालवण,दि.०९ ऑगस्ट
मालवण कुंभारमाठ येथील हुतात्मा प्रभाकर विश्राम रेगे स्मारक येथे क्रांति दिनानिमित्त हुतात्म्याना अभिवादन करण्यात आले यावेळी तहसीलदार गणेश लव्हे यांनी पुष्पचक्र अर्पण करुन मानवंदना दिली. यावेळी सरपंच सौ पूनम वाटेगावकर, उपसरपंच जीवन भोगावकर, तलाठी परब, मुख्याध्यापक संजय खोचरे, यशवंत गावकर. यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते
यावेळी हुतात्मा प्रभाकर रेगे यांच्या प्रतिमेसही मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.