मालवण,दि.२० सप्टेंबर
मालवण आचरा रस्त्यावर ओझर येथे आज रविवारी सायंकाळी बुलेट व रिक्षा यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात बुलेटस्वार राज राजेंद्र कोदे (कांदळगाव) व रिक्षा चालक महेश अनिल घाडी (आचरा पारवाडी) हे दोघेही गंभीर जखमी झाले आहेत. तर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. या दोघांनाही तात्काळ मालवण ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारानंतर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस तसेच ग्रामस्थांनी घटनास्थळी व रुग्णालयात धाव घेतली होती.