प्रशालेचा रुद्र भाट मालवण तालुक्यात प्रथम
मालवण,दि.०३ जुलै
पूर्व उच्च प्राथमिक व पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत कट्टा येथील वराडकर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने उल्लेखनीय यश संपादन करतानाच या प्रशालेतील चार विद्यार्थ्यांनी तालुका व जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला असून इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रुद्र महेश भाट याने मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे
इयत्ता पाचवीच्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत रुद्र महेश भाट याने मालवण तालुक्यात प्रथम क्रमांक तर जिल्हा गुणवत्ता यादीत ग्रामीण भागात १५ वा क्रमांक मिळविला. तर शुभ्रा राजन नाईक हिने तालुक्यात तृतीय क्रमांकासह जिल्हा गुणवत्ता यादीत २९ वे स्थान मिळविले.
इयत्ता आठवीच्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत चंदना बाळकृष्ण शेट्ये हिने जिल्हा गुणवत्ता यादीत ५९ वा क्रमांक, तर वेदांत गुरुप्रकाश म्हाडगूत याने ६५ वा क्रमांक मिळवत प्रशालेच्या यशात भर घातली आहे . या सर्व विद्यार्थ्यांना प्रशाळेच्या मुख्याध्यापिका सौ देवयानी गावडे यांच्यासह सर्व शिक्षकांनी मार्गदर्शन केले
या उल्लेखनीय यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे तसेच त्यांना मार्गदर्शन करणाऱ्या शिक्षकांचे कट्टा पंचक्रोशी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अजयराज वराडकर, संस्था पदाधिकारी, विश्वस्त, मुख्याध्यापिका , शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या.