Malvan : रेवंडी तांडेलवाडी सडा येथे झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत तरुणाचा मृतदेह आढळला

शेअर करा

मिठबाव येथील श्रीधर गुरुकृष्ण नरे यांचा मृतदेह रस्त्यानजीकच्या झाडीत आढळल्याने मालवण तालुक्यात खळबळ

मालवण,दि.१४ ऑक्टोंबर

मालवण तालुक्यातील रेवंडी तांडेलवाडी सडा येथील रस्त्यानजीकच्या झाडीत आज ९ वाजण्याच्या सकाळी मिठबाव देवगड येथील श्रीधर गुरुकृष्ण नरे
या तरुणाचा झाडाला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी डीवायएसपी दीपक शेलार, सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश माने, पोलीस हेडकोंस्टेबल जनार्दन रेवंडकर, राजाराम तेरेखोलकर यांनी दाखल होत पाहणी केली.

घटनास्थळी एक मोटरसायकल आढळून आली आहे. या घटनेबाबत अनेक प्रश्न उपस्थित होत असून तरुणाच्या मृत्यूमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. या घटनेच्या अधिक तपासासाठी पोलिसांनी श्वान पथक व ठसे तज्ज्ञ यांना पाचारण केले आहे. घटनेचे नेमके स्वरूप आणि मृत्यूचे कारण तपासानंतरच स्पष्ट होणार आहे.

शेअर करा