Masore : ‘गमन’ चित्रपटाची कथा नारिंग्रेतील अशोक घाडी यांच्या घराभोवती!

शेअर करा

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती; नारिंग्रे गावातील घर आणि परिसरात चित्रीकरण झाल्याने स्थानिकांमध्ये उत्साह

मसुरे,दि.१४ ऑक्टोंबर(झुंजार पेडणेकर)

मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालेला ‘गमन’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. कोकणातील वास्तववादी आणि कौटुंबिक कथांवर आधारित असलेल्या या चित्रपटाचे एक विशेष आकर्षण म्हणजे, या चित्रपटाचे शूटिंग घाडीगावकर पतपेढीचे संचालक व घाडीगावकर समाजाचे कार्यकारिणी सदस्य अशोक भिकाजी घाडी यांच्या नारिंग्रे गावातील घर तसेच परिसरात झाले आहे. चित्रपटाची संपूर्ण कथाच मध्यंतरापासून त्यांच्या घरावर फिरत असल्याने या भागातील नागरिकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.
चित्रपटात प्रसिद्ध भजनरत्न श्रीधर मुणगेकर यांचे शिष्य नारिंग्रे येथील भजनीबुवा मंगेश भास्कर घाडी हे अत्यंत सुरेल आवाजात भजन सादर करताना दिसत आहेत. त्यांचा सखोल आवाज आणि अप्रतिम हावभाव यामुळे पडद्यावरील कुटुंबातील सर्व जण भजनात तल्लीन झालेले पाहायला मिळतात. विशेष म्हणजे, हे भजनाचे गाणे बुवा मंगेश घाडी यांनी केवळ अर्ध्या तासात कंपोज केले आहे.
​ या चित्रपटाचे चित्रीकरण कुणकेश्वर समुद्रकिनारा, नारिंग्रे एसटी कॅन्टीन, दत्त मंदिर या रमणीय व परिचित परिसरामध्ये झाले आहे.
भूमिकानुसार कलाकारांची निवड अगदी योग्य करण्यात आली आहे. मंदिराच्या दृश्यांमध्ये दशावतारी नाटककार अरुण वायंगणकर, साई ट्रॅव्हल्सचे बाबू पाटील आणि देवगड अर्बन बँकेचे व्यवस्थापक विनोद परब हे कलाकारही झळकले आहेत.
​

शेअर करा