मसुरे : अर्चना म्हात्रे यांना उत्कृष्ट सेवा पदक प्रदान!

शेअर करा

मसुरे ,दि. १८ ऑगस्ट 
                                     नवी मुंबई पोलीस उप आयुक्त विशेष शाखा कार्यालयात कार्यरत असलेल्या  कोकण कन्या पोलीस हवालदार अर्चना जितेंद्र म्हात्रे यांचा भारत सरकार गृह मंत्रालय तर्फे महाराष्ट्र पोलिस  उत्कृष्ट सेवा पदक प्रदान करुन गौरव करण्यात आला. त्यांनी २१ वर्षे सेवा पूर्ण केली आहे. 

सेवा कालावधीमध्ये पोलीस मुख्यालय, सुरक्षा शाखा, गुन्हे शाखा या ठिकाणी कर्तव्य बजावले आहे.
त्यांना आजपावेतो केलेल्या सेवेत १३१ बक्षीस प्राप्त असून सदर कार्याची दखल घेऊन पोलीस महासंचालक कार्यालयाने त्यांना सन 2021 सालाचा पोलीस महासंचालक यांचे “सन्मान चिन्ह” देऊन गौरविले आहे.
मूळ हाशिवरे, अलिबाग येथील

सौ अर्चना या शूटिंगबॉल राष्ट्रीय खेळाडू जितेंद्र म्हात्रे यांची पत्नी असून तेसुद्धा पोलिस दल, नवीमुंबई येथे कार्यरत आहेत. मुंबई शूटिंगबॉल असोसिएशन, सर्व खेळाडू, पदाधिकारी यांच्या वतीने सौ अर्चना यांचे मुंबई शूटिंगबॉल असो. सरचिटणीस दीपक सावंत यानी अभिनंदन केले आहे.

शेअर करा