मसुरे : श्री भगवती देवस्थान मुणगे कडून गुणवंतांचा गौरव.

शेअर करा

मसुरे,दि.२५ ऑगस्ट (झुंजार पेडणेकर )

तुम्हाला प्राप्त झालेले बक्षीस हे आई भगवतीचा तुम्हाला मिळालेला प्रसाद आहे. आजचे यश हे तुमची मेहनत, तसेच शिक्षक आणि पालकांच्या त्यागाचं गोड फळ आहे. इथून पुढे ध्येय ठरवून प्रामाणिक कष्ट करा, यश नक्कीच तुमच्या पाठीशी असेल असे प्रतिपादन सेवानिवृत्त तहसीलदार आर. जे. पवार यानी येथे केले. देवगड तालुक्यातील मुणगे येथील श्री भगवती देवस्थान कमिटीच्या वतीने गावातील अंगणवाडी ते माध्यमिक हायस्कूल मधील प्रत्येक वर्गातील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा रोख रकमेचे पारितोषिक देऊन गौरव करण्यात आला यावेळी ते बोलत होते.यावेळी व्यासपीठावर देवस्थान कमिटी अध्यक्ष ओंकार पाध्ये, उपाध्यक्ष दिलीप दिगंबर महाजन, सचिव निशाद परुळेकर, सदस्य प्रकाश सावंत, आनंद घाडी, पुरुषोत्तम तेली, रामचंद्र मुणगेकर, कृष्णा सावंत, प्रशासक सरपंच सौ अंजली सावंत, पोलीस पाटील सौ साक्षी गोविंद सावंत, देवदत्त पुजारें, शिक्षक प्रसाद बागवे, तंटामुक्ती अध्यक्ष अमित सावंत, दिगंबर पेडणेकर, उपसरपंच दशरथ मुणगेकर आदी व्यासपीठावर उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत देवस्थान सचिव निषाद परुळेकर यानी केले. यावेळी बोलताना धर्माजी आडकर यानी प्रतिवर्षी हा उपक्रम मुणगे देवस्थान कमिटी राबवत आहे त्याबद्दल कौतुक केले. भगवती हायस्कुल शिक्षक प्रसाद बागवे म्हणाले, यश मिळविण्यासाठी मोठे कष्ट करावे लागतात. प्रेरणे ला अध्यात्मिकतेची जोड मिळाल्यास यश तुमचे असेल. अनेक आव्हानाना आज सामोरे जाताना स्पर्धा वाढली आहे. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी सातत्य ठेवा. प्रस्ताविक करताना आबा पुजारे यानी पुढील काळ स्पर्धेचा असणार असल्याने स्पर्धेत टिकून राहून यश प्राप्त करा असे आवाहन केले. जेष्ठ शिक्षक अविनाश राणे यानी मार्गदर्शन केले. प्रज्ञाशोध परीक्षेतील गुणवंत विद्यार्थी दक्षेश गुरुप्रसाद मांजरेकर याचा तसेच क्रीडा स्पर्धेतील यशस्वी गुणवंत विद्यार्थ्यांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यावेळी मुणगे सोसायटी अध्यक्ष गोविंद सावंत, डॉ. के. एन. नायसे, देवस्थान लिपिक रामतीर्थ कारेकर, ग्रा सदस्य धर्माजी आडकर, सुनिल सावंत, शिक्षक प्रवीण सावरे, नंदकुमार सोनटक्के, विकी खैरनार, पांडुरंग नाडगौडा, अविनाश राणे, रवींद्र दवणे, गुरुप्रसाद मांजरेकर, ग्रामस्थ संजय घाडी, माजी सरपंच सुरेश बोरकर,आसावरी मुणगेकर, सायली रासम, आरती सावंत, अनुजा कारेकर, रिया धुवाळी, सौ मेघना धुवाळी, प्राजक्ता महाजन, रिशिका राजेश गावकर, अजित रासम, साईनाथ रासम, संदेश घाडी, शंभू आईर, सत्यवान लब्दे, विश्वास मुणगेकर आदी ग्रामस्थ, विध्यार्थी उपस्थित होते. आभार सचिव निषाद परुळेकर यांनी मानले.

शेअर करा