मसुरे,दि.२३ ऑगस्ट
गोळवण कुमामे डिकवल गावच्या महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी माजी सरपंच श्री सुभाष लाड यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. तर उपाध्यक्ष पदी श्री आप्पा घाडी यांची ग्रामसभेत सर्वानुमते निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित अध्यक्ष,उपाध्यक्ष व सर्व समिती सदस्य यांचे अभिनंदन करण्यात आले.