मसुरे : अध्यात्मासोबतच सामाजिक कार्याची जोड देणे काळाची गरज! अक्कलकोट भूषण नंदकुमार पेडणेकर यांचे प्रतिपादन

शेअर करा

मसुरे, दि. २० जून (झुंजार पेडणेकर)

श्री दत्त स्वामी सेवा केंद्राच्या वतीने आज गोरेगाव छोटा काश्मीर येथील श्री स्वामी समर्थ मठात जो वह्या वाटपाचा उपक्रम राबवण्यात आला आहे, तो अत्यंत कौतुकास्पद आणि काळाची गरज असणारा आहे. ‘भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे’ हा स्वामींचा संदेश आपल्याला केवळ संकटात धीर देत नाही, तर समाजातील शेवटच्या घटकाची सेवा करण्याची प्रेरणाही देतो. आज या सेवा केंद्राने स्वामी माऊलींच्या याच सेवेचा एक भाग म्हणून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप केले आहे. मी आयोजकाना यासाठी धन्यवाद देतो असे प्रतिपादन श्री स्वामी सामर्थ मठ हडपिडचे संस्थापक सचिव अक्कलकोट भूषण पुरस्कार प्राप्त नंदकुमार पेडणेकर यानी येथे केले. श्री दत्त स्वामी सेवा केंद्र यांच्या वतीने छोटा काश्मीर गोरेगाव श्री स्वामी सामर्थ मठ येथे वह्या वाटप करण्यात आले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलतं होते. यावेळी कोकण कट्टा संस्थापक अजीत पीतळे,


गोरेगाव मठाचे प्रथमेश गुराम, प्रशांत पिळणकर, प्रकाश सातार्डेकर अंकुश सावंत, अर्चना गुराम, विद्या सातार्डेकर, अस्मिता सावंत, मंदाकिनी सावंत,सुवर्णा निकम,मोनाली कातकर, अरविंद मोहिते,नयन मोरे आणि प्रविण पिळणकर सेवेकरी उपस्थित होते.

शेअर करा