मसुरे,दि.१४ ऑगस्ट (झुंजार पेडणेकर)
परब को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., मुंबईतर्फे शैक्षणिक वर्ष २०२५–२६ मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव सोहळा 30 ऑगस्ट रोजी पराग विद्यालय भांडूप येथे सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे. इयत्ता १० वी, १२ वी, डिप्लोमा, पदवी तसेच उच्च शिक्षण परीक्षांमध्ये ७५ टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवून प्रथम तीन क्रमांकांत स्थान मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांचा संस्थेच्या वार्षिक सभेत सन्मान करण्यात येणार आहे. सभासदांनी आपल्या पाल्यांच्या गुणपत्रिकेची छायांकित प्रत शुक्रवार, दि. २१ ऑगस्ट २०२६ पर्यंत परब को-ऑप क्रेडिट सोसायटी, त्रिमूर्ती को-ऑप हाऊसिंग सोसायटी, शिवाजीनगर, नवजीवन शाळेसमोर, भांडुप (पश्चिम), मुंबई – ४०००७८ येथील मुख्य कार्यालयात सादर करावी. तसेच कोकण विभागातील मुंबई, मुंबई उपनगर सह सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, पालघर या जिल्ह्यातील सभासद व्यतिरिक्त असलेल्या कोणत्याही विषयात १०० पैकी १०० गुण मिळविणाऱ्या कोणत्याही समाजाच्या / धर्माच्या विद्यार्थ्यांनाही विशेष पारितोषिक देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती संस्थेतर्फे देण्यात आलीआहे.उपस्थितीचे आवाहन संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीकृष्ण (दीपक) द. परब यांनी केले आहे.