मसुरे: आईचे दूध हेच नवजात बालकासाठी सर्वोत्तम अमृत! डॉ. प्रियांका पाटील

शेअर करा

मसुरे आरोग्य केंद्रात स्तनपान सप्ताहानिमित्त मार्गदर्शन कार्यक्रम

मसुरे,दि.०७ ऑगस्ट( झुंजार पेडणेकर)

प्राथमिक आरोग्य केंद्र मसुरे येथे जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमात गर्भवती माता, स्तनदा माता व त्यांच्या कुटुंबीयांना स्तनपानाचे महत्त्व याविषयी माहिती देण्यात आली, नवजात बालकाला जन्मानंतरच्या पहिल्या तासात स्तनपान सुरू करण्याची आवश्यकता, पहिले सहा महिने केवळ आईचे दूध देण्याचे फायदे तसेच दोन वर्षे किंवा त्याहून अधिक काळ पूरक आहारासह स्तनपान सुरू ठेवण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
येथील वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रियांका पाटील यांनी उपस्थित महिलांना स्तनपानामुळे बालकाची रोगप्रतिकारक शक्ती वाढते, कुपोषण टाळण्यास मदत होते तसेच आईच्या आरोग्यास होणारे फायदे याबाबत माहिती दिली. कार्यक्रमादरम्यान शंका-समाधान सत्र घेऊन लाभार्थींना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.तसेच आशा ताईनी रोल प्ले सादर करुन स्तनपानविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी .जी. प. सदस्या सौ क्षमा हडकर, डॉ वीणा मेहेंदळे, एकात्मिक बालविकास केंद्र मालवणच्या सीडीपिओ सौ.हजारे, सौ पल्लवी नाचणकर, मुख्यसेविका,आशा सेविका,प्राथमिक आरोग्य केंद्र तिल सर्व कर्मचारी वृंद अंगणवाडी सेविका,मदतनीस उपस्थित होत्या.

शेअर करा