मसुरे : सुयोग धामापूरकर यांची बुद्धिबळ पंचपदी निवड!

शेअर करा

मसुरे, दि. २० जून (झुंजार पेडणेकर)

सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलचे जिल्हाध्यक्ष सुकळवाड गावचे सुपुत्र श्री. सुयोग मारुती धामापूरकर यांची राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच (State Chess Arbiter) म्हणून निवड जाहीर झाली आहे.
महाराष्ट्र चेस असोसिएशनतर्फे रत्नागिरी येथे आयोजित राज्यस्तरीय बुद्धिबळ पंच परीक्षेत त्यांनी घवघवीत यश संपादन करून सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.
बुद्धिबळ क्षेत्रातील त्यांचे नेतृत्व, संघटन कौशल्य व सातत्यपूर्ण कार्य यामुळे सिंधुदुर्ग जिल्हा चेस सर्कलला नवी दिशा मिळणार आहे. त्यांच्या निवडी बद्दल अभिनंदन होत आहे.

शेअर करा