कणकवलीत ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ उत्साहात
कणकवली,दि.०३ ऑगस्ट
महाराष्ट्र शासनाच्या महसूल विभागाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान शिबिर’ अभियानांतर्गत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली तहसीलदार कार्यालय येथे समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिराच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची कणकवली नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी भेट घेत त्यांचे स्वागत केले व अभियानाच्या यशस्वी आयोजनासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी महसूल विभागाच्या माध्यमातून नागरिकांना अधिक प्रभावी, पारदर्शक आणि गतिमान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी शासन करत असलेल्या प्रयत्नांचेही कौतुक करण्यात आले.