मुंबई,दि.१८ जून
कोकण कट्टा मुंबई संस्थेच्या वतीने तसेच जगन्नाथ (दादा) गावडे यांच्या विशेष प्रयत्नांतून न्यू इंग्लिश स्कूल, पेंडूर येथील विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप करण्यात आले.
शाळा प्रवेशोत्सवाचे औचित्य साधून इयत्ता पाचवी ते दहावीपर्यंतच्या एकूण ९५ विद्यार्थ्यांना वह्यांचे वितरण करण्यात आले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाबाबत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
यावेळी प्रशालेचे मुख्याध्यापक श्री. सुरेश तावडे, संस्थेचे अध्यक्ष श्री. बाबाराव राणे, सचिव श्री. घनश्याम राणे, संस्थेचे पदाधिकारी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, ग्रामस्थ तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी या स्तुत्य उपक्रमाचे कौतुक करत विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगतीसाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे आयोजन खांदवाडी ग्रामस्थ मंडळाचे योगेश सावंत व सागर गावाडे्, सोनाली गावडे यांनी यशस्वी केले