मुंबई : गुरुदक्षिणेतून भारतीय संस्कृतीचा उजाळा; शिक्षिका सुनीता राणे यांचा ८५वा वाढदिवस उत्साहात

शेअर करा

उद्योजक सुनील जोशी यांची गुरुवर्यांना अनोखी गुरुदक्षिणा; गुरु-शिष्य परंपरेचा जप करणाऱ्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक

मुंबई,दि.०६ जुन

भारतीय संस्कृतीतील गुरु-शिष्य परंपरेचा सुंदर आदर्श मुंबईत पाहायला मिळाला. इलेक्ट्रिक क्षेत्रातील नामांकित उद्योजक तथा वरदान लोथियम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक-अध्यक्ष सुनील जोशी यांनी आपल्या गुरुवर्य शिक्षिका सुनीता बाबाजी राणे यांच्या ८५व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात गुरुदक्षिणा अर्पण करून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली.

या विशेष सोहळ्यात सुनील जोशी यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे आयोजन सुप्रिया साटम, राणे यांचे माजी विद्यार्थी तसेच इतर विद्यार्थ्यांनी केले होते. वाढदिवसाच्या निमित्ताने गुरुंच्या ऋणाची जाणीव ठेवत त्यांना सन्मानित करण्यात आले.

भारतीय संस्कृतीत गुरुंना सर्वोच्च स्थान देण्यात आले असून भगवान श्रीराम, भगवान श्रीकृष्ण आणि अर्जुन यांच्या आदर्शातून ही परंपरा आजही प्रेरणादायी ठरत आहे. आधुनिक युगातही या संस्कारांचे जतन करत सुनील जोशी यांनी कृतीतून गुरु-शिष्य नात्याचे महत्त्व अधोरेखित केल्याबद्दल उपस्थितांनी त्यांचे विशेष कौतुक केले.

शेअर करा