मुंबई,दि.२३ जून
राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांची शिवसेना आमदार रविंद्र फाटक यांनी सदिच्छा भेट घेत वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या.
यावेळी आमदार फाटक यांनी मंत्री राणे यांच्या उत्तम आरोग्यासाठी, दीर्घायुष्यासाठी तसेच समाजसेवा आणि जनहिताच्या कार्यात त्यांना निरंतर यश लाभावे, अशा सदिच्छा व्यक्त केल्या. राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी ते करत असलेल्या कार्याचे कौतुक करत त्यांचे अभिनंदनही करण्यात आले.
आमदार रविंद्र फाटक यांनी मंत्री नितेश राणे यांचे नेतृत्व आणि जनसामान्यांच्या प्रश्नांबाबतची त्यांची बांधिलकी प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच भविष्यातही त्यांच्या माध्यमातून राज्याच्या विकासाला अधिक गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला.
यावेळी उपस्थितांनीही मंत्री नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देत त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा व्यक्त केल्या.
मंत्री नितेश राणे यांचे कार्य जनहितासाठी असेच प्रेरणादायी राहो आणि त्यांना उत्तम आरोग्य व यश लाभो, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.