मुंबई : आठवडा लोटलेल्या एनटीसी गिरणी कामगार उपोषण प्रश्नी आता राज्यसरकाने त्वरित मध्यस्थी करावी!

शेअर करा


मुंबई,दि.१८ सप्टेंबर

राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या वतीने बंद एनटीसी गिरण्या पूर्ववत चालू कराव्यात,मागील ११ महिन्याच्या थकबाकी पोटीचा पगार त्वरित देण्यात यावा, निवृत्त होणाऱ्या कामगारांची ग्रॅच्युईटी देण्यात यावी,इत्यादी कामगारांची रखडलेली देणी देण्यात यावी,अशा घोषणा आज १२ व्या दिवशी साखळी उपोषणात करण्यात आल्या आहेत.आज जवळपास आठवड्या नंतरही साखळी उपोषणात कामगारांचा जोश कायम होता.
कामगार नेते आणि विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी गेल्या महिन्यात दिल्ली येथे खासदारांच्या शिष्ट मडळासमवेत,केंद्रीय मंत्र्यांच्या भेटी घेऊन वरील ‘एनटीसी’ गिरण्यांच्या प्रश्नांवर सकारात्मक चर्चा केली होती.त्याकडे कामगारांच्या-साखळी उपोषणाद्वारे केंद्र सरकारचे लक्ष वेधण्यात आले आहे.
आता या प्रश्नावर राज्यसरकारनेही केंद्र सरकारकडे मध्यस्थी करून येणाऱ्या सर्व सणासुदीमधील कामगारांची आर्थिक तोषिश संपुष्टात आणावी,अशी आग्रहाची विनंती राष्ट्रीय मिल मजदूर संघाचे सरचिटणीस गोविंदराव मोहिते, यांनी उपोषणादरम्यान केली आहे.
(१)टाटा मिल, (२)हंदू मिल क्रमांक ५, (३)पोद्दार मिल, (४)दिग्विजय मिल या बंद एनटीसी गिरण्यांवरील कामगारांच्या साखळी उपोषणाचे खजिनदार निवृत्ती देसाई,उपाध्यक्ष रघुनाथ शिर्सेकर,बजरंग चव्हाण,सुनिल बोरकर,सेक्रेटरी शिवाजी काळे यांनी नेतृत्व केले.सर्वश्री संघटन सचिव एम.पी.पाटील, दीपक राणे,बबन आसवले, गजानन कदम,प्रकाश भोसले आणि प्रतिनिधी, कार्यकर्ते, महिला कार्यकर्त्या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.
या गिरण्या गेल्या पाच वर्षापासून बंद असून,राज्यात सुमारे दहा हजार कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांची दीर्घ काळ उपासमार सुरू आहे.संघटनेने न्यायालयीन मार्गाने तसेच गिरण्यांचे गेटवर,विधानसभेवर सातत्याने लढे उभारून हा प्रश्न धगधगत ठेवला आहे.

शेअर करा