नगरसेवक मंदार शिरसाठ यांच्या पुढाकाराने विद्यार्थी व शैक्षणिक संस्थांशी संवाद; विविध समस्या आणि मागण्यांवर चर्चा होणार
मुंबई विद्यापीठ सिनेट सदस्यांचा सोमवार ७ सप्टेंबर रोजी कुडाळ विशेष दौरा; विद्यार्थ्यांच्या समस्यांवर होणार थेट चर्चा
कुडाळ,दि.२४ ऑगस्ट
मुंबई विद्यापीठाच्या (Mumbai University) अधिसभेचे (सिनेट) सदस्य कुडाळ दौऱ्यावर येत असून, या दौऱ्यांतर्गत ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न, शैक्षणिक अडचणी आणि पायाभूत सुविधांचा आढावा घेण्यासाठी स्थानिक विद्यार्थी, प्राध्यापक व व्यवस्थापनाशी थेट संवाद साधणार आहेत.
दौऱ्याचा मुख्य उद्देश आणि महत्त्वाचे मुद्दे:
विद्यार्थ्यांच्या अडचणींचे निवारण:
परीक्षा निकालांमधील विलंब, पुनर्मूल्यांकन (Revaluation), हॉल तिकीट आणि गुणपत्रिकांमधील चुका यांसारख्या गंभीर समस्यांवर विद्यार्थी आणि युवा संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली जाईल.
सिंधुदुर्ग उपकेंद्राचा प्रश्न: मुंबई विद्यापीठाच्या सिंधुदुर्ग उपकेंद्राची रखडलेली कामे आणि तिथल्या असुविधांवर मात करून स्थानिक स्तरावर विद्यार्थ्यांना चांगल्या सेवा कशा देता येतील, यावर कॉलेजमधील शैक्षणिक घटकांचे मत जाणून घेतले जाईल.
नवीन शैक्षणिक धोरण (NEP) आढावा: महाविद्यालयात ‘एनईपी’ (NEP) अंमलबजावणी दरम्यान येणाऱ्या अडचणी आणि क्रेडिट सिस्टीमबाबत प्राध्यापकांशी चर्चा करण्यात येईल.
निवेदन स्वीकारणे:
विविध कॉलेजचे विद्यार्थी आणि संघटना आपल्या प्रलंबित मागण्यांचे निवेदन यादरम्यान सिनेट सदस्यांना सादर करू शकतील
तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या समस्या असतील त्यांनी आपल्याशी संपर्क करावा असे आवाहन नगरसेवक मंदार शिरसाठ यांनी केले आहे