सावंतवाडी,दि.१८ जुलै ( अभिमन्यू लोंढे)
सावंतवाडीचे सुपुत्र, आमदार दीपक केसरकर यांचा ७१ वा वाढदिवस आहे.जनमानसात ‘नगरशेठ’ म्हणून ओळखले जाणारे त्यांचे वडील कै. वसंतशेठ केसरकर यांच्या पावलांवर पाऊल ठेवत, केसरकर यांनी सार्वजनिक जीवनात रोटरी क्लबपासून सुरुवात केली. नगरसेवक, सलग नऊ वर्षे सावंतवाडीचे नगराध्यक्ष, आणि चार वेळा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून विजयी होत त्यांनी एक यशस्वी राजकीय कारकीर्द घडवली आहे.
केसरकर कुटुंबाचा उद्योग, व्यवसाय आणि व्यापार क्षेत्रातील तीन पिढ्यांचा समृद्ध वारसा घेऊन, दीपक केसरकर यांनी आपली जिद्द, चिकाटी आणि दूरदृष्टी या गुणांनी सामाजिक, शैक्षणिक, पर्यटन, सहकार, क्रीडा आणि राजकीय क्षेत्रात टप्प्याटप्प्याने प्रगती केली. त्यांनी महाराष्ट्र राज्याचे शिक्षण व मराठी भाषा मंत्री, कोल्हापूर व मुंबई शहर पालकमंत्री, सिंधुदुर्ग पालकमंत्री, चांदा ते बांदा योजना अध्यक्ष, सिंधू रत्न योजनेचे अध्यक्ष, गृह, अर्थ, नियोजन, ग्रामविकास राज्यमंत्री अशा विविध महत्त्वाच्या पदांवर काम केले आहे. सिंधुरत्न योजनेच्या उपाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास:
दीपक केसरकर यांनी सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील (सावंतवाडी, वेंगुर्ला आणि दोडामार्ग तालुके) सर्वांगीण विकासासाठी अहोरात्र प्रयत्न केले आहेत. आमदार आणि मंत्री म्हणून त्यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. त्यांच्या कार्यकाळात वेंगुर्ल्यातील पाणबुडी प्रकल्प, आंबोलीतील थंड हवेच्या ठिकाणी धबधब्यांचा विकास, वन विभागात पर्यटन विकास योजना यांसारख्या अनेक प्रकल्पांना गती मिळाली. ‘चांदा ते बांदा’ आणि ‘सिंधू रत्न’ या योजनांच्या माध्यमातून त्यांनी स्थानिक नागरिकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी विविध पातळ्यांवर काम केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,आणि सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली ते सध्या कार्यरत आहेत. विशेषतः शिवसेना पक्षाचे प्रमुख उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ते सर्वांगीण विकास आणि संघटनात्मक बांधणीसाठी सक्रिय पुढाकार घेत आहेत.

सावंतवाडी, दोडामार्ग आणि वेंगुर्ला तालुक्यात त्यांच्या पुढाकाराने शेकडो विकास कामांवर कोट्यवधी रुपये खर्च झाले आहेत. शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या सबल करण्यासाठी ते सतत कार्यरत आहेत. श्री पद्धतीने भात शेती, मध उत्पादन, हळद लागवड, काजू बोंडे प्रक्रिया उद्योग, पर्यटन, मच्छीमारांना योजना, बागायतदारांना दिलासा, महिला बचत गटांना प्रोत्साहन यांसारख्या अनेक उपक्रमांना त्यांनी पाठिंबा दिला आहे.

शिक्षणमंत्र्यांच्या खुर्चीवरून दूरदृष्टीचे निर्णय:
कोरोना काळानंतर शिक्षण क्षेत्रातील अनेक आव्हाने समोर होती. शाळा पूर्ववत सुरू करणे, अभ्यासक्रम, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न मार्गी लावणे, शिक्षक भरती असे अनेक महत्त्वपूर्ण प्रश्न सोडवण्याची मोठी जबाबदारी दीपक केसरकर यांच्यावर होती. ही जबाबदारी त्यांनी यशस्वीपणे पार पाडली असे म्हणावे लागेल. त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या अनेक निर्णयामुळे विद्यार्थी आणि पालक वर्गात समाधानाचे वातावरण आहे.

दप्तराचे ओझे कमी करणारा क्रांतीकारी निर्णय
गेल्या अनेक वर्षांपासून विद्यार्थ्यांच्या दप्तराच्या ओझ्याबाबत चर्चा सुरू होती, परंतु त्यावर ठोस उपाययोजना होत नव्हती. मात्र, २०२३-२४ या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी करण्याचा निर्णय घेतला.
महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाने इयत्ता दुसरी ते आठवीपर्यंतच्या पुस्तकांची रचना बदलली. आता इयत्तानिहाय सर्व विषयांचे चार भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक भागात सर्वच विषयांच्या अभ्यासक्रमाचा समावेश आहे आणि विशेष म्हणजे, पुस्तकात एक धडा संपल्यानंतर वहीचे एक पान जोडण्यात आले आहे. ८ मार्च २०२३ रोजी राज्य सरकारने शासन निर्णय जारी करून पाठ्यपुस्तकाची रचना एकात्मिक केली, ज्यामुळे जवळपास ७५% दप्तराचे ओझे कमी झाले.

‘
‘मुख्यमंत्री माझी शाळा- सुंदर शाळा’ अभियानाने तर शाळा-शाळांमध्ये एक चैतन्य निर्माण केले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि आनंददायी, प्रेरणादायी वातावरण निर्मितीसाठी राबवले गेलेले हे अभियान महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री, विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकाराने सुरू झाले. विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता विकासाबरोबरच शिक्षणासाठी आवश्यक आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरास प्रोत्साहन देणाऱ्या या योजनेमुळे महाराष्ट्रातील शाळांचा खऱ्या अर्थाने कायापालट झाला.
शिक्षणमंत्री असताना घेतलेले महत्त्वाचे निर्णय :

- एक राज्य एक गणवेश कल्पना: सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांना एकच रंगाचा गणवेश, लाखो विद्यार्थ्यांना मोफत गणवेश.
- आजी-आजोबा भेट: ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान, नातवंडांना आजी-आजोबांचे प्रेम देणारा उपक्रम.
- पाचवी व आठवी शिष्यवृत्तीत वाढ: पाचवीसाठी ₹५,००० आणि आठवीसाठी ₹७,५०० प्रति वर्ष शिष्यवृत्ती. वार्षिक उत्पन्नाची मर्यादा काढून टाकल्याने अधिक विद्यार्थ्यांना लाभ.
- सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये ज्युनिअर, सिनियर केजीचे वर्ग: शिशूवर्गापासूनच मुलांचा बौद्धिक आणि शैक्षणिक विकास, मातृभाषेतील शिक्षणासाठी प्रोत्साहन.
- जर्मनी सामंजस्य करार: कौशल्य विकास आणि पर्यटनाबाबत करार.
- पहिले पाऊल उपक्रम: शैक्षणिक गुणवत्ता वाढीचा अभिनव उपक्रम, पहिल्या वर्गात येणाऱ्या विद्यार्थ्यांची पूर्वतयारी.
- एकात्मिक पुस्तक संकल्पना: पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांचे दप्तराचे ओझे कमी, प्रत्येक पुस्तकात वह्यांची कोरी पाने.
- स्किल एज्युकेशन: पुस्तकी ज्ञानासोबत कौशल्य आणि तंत्रज्ञान आधारित शिक्षण, नवीन शैक्षणिक धोरणातून लाखो नोकरीच्या संधी.
- युरोपीय देशांसोबत स्किल एज्युकेशन संदर्भात सामंजस्य करार: युरोपीय देशांमध्ये कुशल मनुष्यबळाची गरज, कौशल्य शिक्षणातून परदेशात नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न.
दीपक केसरकर यांचा आतापर्यंतचा प्रवास कार्यतत्परता, दूरदृष्टी आणि विकासाची तळमळ दर्शवतो. त्यांना पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा! आमदार दीपक केसरकर दूरदृष्टी

चांदा ते बांदा योजना आणि नंतर सिंधू रत्न योजनेच्या माध्यमातून शेतकरी, मच्छीमार, बागायतदार, पर्यटन व्यावसायीक, कलाकार अशा विविध पातळ्यांवर काम केले. दूरदृष्टी ठेवून वाटचाल करीत असताना तळागाळातील लोकांपर्यंत कुक्कुट पालन,शेळी पालन,मच्छी पालन, दुधाळ जनावरे, हाऊस बोट, धबधबे विकास, वन पर्यटन, पर्यटनासाठी वाहने, दशावतारी कलावंतांना वाहने, श्री गणेश चित्रशाळात साहित्य, कृषी आर्मी, श्री पध्दतीने भात शेती, हळद लागवड, काजू बोंडे प्रकिया, मध उत्पादन अशा विविध पातळ्यांवर काम केले.

आमदार केसरकर सावंतवाडीचे आधुनिक शिल्पकार!
श्रीमंत तरीही गोरगरीब जनतेसाठी काम
आमदार केसरकर यांची तीन पिढ्यांची श्रीमंती सर्वश्रुत आहे. त्यांनी कुटुंबाचा उद्योग, व्यवसाय सांभाळत गेल्या ४० वर्षापेक्षा जास्त काळ समाजसेवक म्हणून काम केले. त्यांच्या पत्नी सौ पल्लवी केसरकर यांनी देखील सावंतवाडी शहराच्या नगराध्यक्ष पदाचा कार्यभार लोकप्रिय करून दाखविला आहे. आमदार दीपक केसरकर यांनी नगराध्यक्ष असताना सावंतवाडी शहरातील विविध पातळ्यांवर काम केले त्यांना आधुनिक शिल्पकार म्हणून ओळखले जाते. त्यांनी लोकप्रियता मिळवली आणि सावंतवाडी विधानसभा मतदारसंघात चौथ्यांदा आमदार झाले. तेही मोठ्या मताधिक्याच्या फरकाने विजय झाले.

थोडक्यात आमदार दीपक केसरकर
१) नाव : श्री. दिपक वसंतराव केसरकर
२) जन्म दिनांक : १८ जुलै १९५५
जन्म ठिकाण: सावंतवाडी
३) शिक्षण:बी. कॉम, डिप्लोमा इन एक्स्पोर्ट मॅनेजमेन्ट,प्राथमिक शिक्षण कानविंदे शाळा उभाबाजार सावंतवाडी,माध्यमिक शिक्षण – कळसुलकर हायस्कूल, सावंतवाडी,
शिवाजी हायस्कूल, सावंतवाडी,कॉलेज एस.पी.के. कॉलेज, सावंतवाडी
४) पक्ष शिवसेना
५) ज्ञात भाषा : मराठी, हिंदी, इंग्रजी, कोंकणी (गोवा)
६) व्यवसाय : बांधकाम व्यवसायिक, रिसॉर्ट, सिनेमागृह, नाट्यगृह व शेती-बागायती
७) कौटुंबिक माहिती विवाहित
पत्नीचे नांव : सौ. पल्लवी दिपक केसरकर
८) अपत्ये : एकूण – मुलगी : सौ सोनाली वगळ
९) मतदार संघ :(अ) क्रमांक २७० (च) नांव सावंतवाडी (क) जिल्हा सिंधुदुर्ग
१०) अ) कायमचा पत्ता : श्रीधर अपार्टमेन्ट, एस.टी. स्टॅण्ड समोर मु.पो.ता. सावंतवाडी, जिल्हा- सिंधुदुर्ग
११) छंद आणि विशेष आवड: वाचन, क्रिकेट, लॉन टेनिस, टेबल टेनिस, जनतेच्या हिताचे प्रश्न सोडवणे
१२) परदेश प्रवास: अमेरिका, युरोप व इंडोनेशिया, जर्मन , ब्राझील इत्यादी देशांचा अभ्यास दौरा.
१३) कार्याचा तपशील :

सध्याची पदे -अध्यक्ष सिंधुरत्न समृद्ध योजना, महाराष्ट्र राज्य
उपाध्यक्ष सिंधुरत्न योजना.
सन २०२४ चे विधानसभा विधेयक क्रमांक ३३ महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक २०२४ या दोन्ही सभागृहांची संयुक्त समिती सदस्य
सन २०२५ पंचायत राज समिती, महाराष्ट्र राज्य समिती सदस्य
विधानसभा सदस्य : २००९,२०१४,२०१९ व २०२४ ( चार वेळा वीजयी)
अ) शैक्षणिक, सामाजिक व सांस्कृतिक कार्य , पर्यटन.
विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
शिष्यवृत्ती योजना सुरु केली
महिलांसाठी बांबू प्रशिक्षण सुरु केले
फळ प्रक्रिया केंद्र सुरु केली
बेरोजगारांसाठी हॉटेल मॅनेजमेंट प्रशिक्षण केंद्र सुरु केले
विविध कला व वस्तू संग्रहालयाची निर्मिती केली
भजनी मंडळाना सर्वतोपरी सहकार्य

ब) भुषविलेली पदे
शिवसेना पक्षातून आमदार विधानसभा सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ
सदस्य इतर मागासवर्ग कल्याण समिती विधानसभा
*अध्यक्ष रोटरी चॅरीटेबल ट्रस्ट
*संस्थापक सदस्य नॅशनल असोसिएशन फॉर ब्लाईंड (NAB)
*जिल्हा समादेशक भारत स्काऊट आणि गाईड संस्था, सिंधुदूर्ग
*कोकण रेल्वे युझर्स सल्लागार समितीचे सदस्य
*बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापिठ दापोलीचे सिनेट सदस्य.
*राष्ट्रीय आरोग्य अभियान समिती सदस्य.
*कार्यकारी सदस्य जवाहर नवोदय विद्यालय सांगेली सावंतवाडी (भारत सरकार उपक्रम)
*अध्यक्ष जिल्हा साक्षरता अभियान
*उपाध्यक्ष शिवाजी शिक्षण संस्था, सावंतवाडी
*कॅबिनेट मंत्री, शालेय शिक्षण व भाषा, महाराष्ट्र राज्य व पालकमंत्री मुंबई शहर,कोल्हापूर
*राज्यमंत्री वित्त व नियोजन, गृह (ग्रामीण) तथा पालकमंत्री सिंधुदुर्ग
*महाराष्ट्र राज्यातील सर्व नगराध्यक्ष व नगरपरिषदांची संघटना असलेल्या महाराष्ट्र राज्य नगरपरिषद महासंघ या शिखर संस्थेचे अध्यक्ष म्हणून महत्वाची भूमिका
*समिती प्रमुख, विशेष हक्क समिती विधानसभा, महाराष्ट्र राज्य

क) सहकार क्षेत्रातील कार्य (संस्था पदाधिकारी व कालावधी) :
“अध्यक्ष बाळासाहेब नागरी पतसंस्था
*संचालक आजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना
*अध्यक्ष सावंतवाडी अर्बन को.ऑप. बैंक
*अध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा खादीग्रामोद्योग मंडळ
ड) राज्य व केंद्र शासकिय समित्या / महामंडळे (पदाधिकारी व कालावधी) :
*कोकण रेल्वे युझर्स सल्लागार समितीचे सदस्य
*बाळासाहेब सावंत कोकण कृषी विदयापिठ दापोलीचे सिनेट सदस्य.
*राष्ट्रीय आरोग्य अभियान समिती सदस्य.
*संचालक इंडीयन प्लायवूड रिसर्च अॅण्ड ट्रेनिंग इन्टीटयूट (भारत सरकार) बेंगलोर
*संचालक महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळ
*सदस्य महाराष्ट्र राज्य ग्रंथालय परिषद
*सदस्य जिल्हा पाणी पुरवठा कार्यकारी समिती
*सदस्य जिल्हा रुग्णालय अभ्यागत समिती
*सदस्य रोजगार हमी समिती
*समिती प्रमुख, विशेष हक्क समिती विधानसभा

ड) राजकीय कार्य (पक्ष संघटनेतील पदाधिकारी व कालावधी)
*काँग्रेस पक्षाचे १० वर्षे तालुका अध्यक्ष पद
*राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ९ वर्षे जिल्हा अध्यक्ष पद,४ वर्षे प्रदेश कार्यकारिणी सदस्य
*जिल्हाध्यक्ष सिंधुदुर्ग जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
*राष्ट्रवादी पक्षातून शिवसेना पक्षामध्ये प्रवेश ऑगस्ट २०१४
*स्थानिक स्वराज्य संस्थांमधील कार्य (पदाधिकारी व कालावधी)

अ) नगरपालिका :
अध्यक्ष महाराष्ट्र राज्य नगरपरिषद महासंघ मुंबई ५ वर्षे
*भारतातून उत्कृष्ट पायाभूत कायमस्वरूपी टिकणाऱ्या सुधारणा केलेल्या शहराच्या निवडीमध्ये भारतातील चार महानगरांच्या जोडीला सावंतवाडी या शहराची निवड होऊन त्याबाबतचे सादरीकरण लंडन येथील जागतिक नगर परिषदेच्या शिखर परिषदेत सादर करण्याचा बहुमान मिळविला.
*१५ वर्षे सदस्य आणि ९ वर्षे सावंतवाडी नगरपालिकेचे नगराध्यक्ष म्हणून उत्कृष्ट कामगिरी करुन नगर परिषदेला आदर्श नगरपालिका म्हणून राज्य शासनाचा पुररस्कार,

- २००९, २०१४, २०१९,२०२४ चार वेळा सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार
- उल्लेखनीय कार्याचद्दल मिळालेले पुरस्कार :
केंद्र शासनाच्या पर्यावरण विभागाच्या बांबू व लाकडावर संशोधन करणाऱ्या इप्रोटी बेंगलोर या संस्थेवर संचालक म्हणून त्यांनी काम केले असून, पर्यटन या क्षेत्रात सिंधुदुर्ग जिल्हयात विशेषतः सावंतवाडीमध्ये केलेल्या कामगिरीचा राष्ट्रीय स्तरावर गौरव.
*कमी उत्पन्न असलेल्या क वर्ग नगरपालिकेमध्ये विविध मूलभूत सुविधा, पर्यटन व ऐतिहासिक वास्तू संवर्धन, हस्तकला व लोककला संवर्धन, पाणी पुर्नवापर, निसर्ग संवर्धन असे उपक्रम राबविले व ते राष्ट्रीय स्तरावर गौरविण्यात आले, कॉमन वेल्थ नॅशनलच्या स्थानिक स्वराज्य संस्थाच्या संघटनेतर्फे या शहरात राबविण्यात आलेल्या उत्कृष्ठ उपक्रमाचे सादरीकरण लंडन (युनायटेड किंगडम) येथे करण्याची संधी प्राप्त झाली.
