अध्यक्षपदी सचिन दहिबावकर तर उपाध्यक्षपदी दशरथ मुणगेकर यांची निवड
देवगड,दि.१२ ऑगस्ट
देवगड : सिंधुदुर्ग जिल्हा चर्मकार उन्नती मंडळाची देवगड तालुकास्तरीय बैठक नुकतीच उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या बैठकीत देवगड तालुक्यासाठी नवीन कार्यकारिणीची निवड करण्यात आली.
नवीन कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी सचिन शांताराम दहिबावकर यांची निवड करण्यात आली. तसेच दशरथ शिवाजी मुणगेकर यांची उपाध्यक्षपदी, सचिन मनोज मुणगेकर यांची सचिवपदी, तर चंद्रकांत रामचंद्र मुणगेकर यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली. याशिवाय विजय मुणगेकर यांची तालुका उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.
बैठकीत चर्मकार समाजाचे संघटन अधिक मजबूत करणे, शैक्षणिक तसेच सामाजिक उपक्रमांना चालना देणे आणि समाजातील विविध घटकांना एकत्र आणण्याबाबत चर्चा करण्यात आली. आगामी काळात समाजाच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा निर्धार नवनिर्वाचित कार्यकारिणीने व्यक्त केला.
या बैठकीस तालुकाध्यक्ष सचिन दहिबावकर, तसेच सदस्य देवेंद्र जाधव, श्री. विश्वनाथ गोपाळ पिसेकर, दीपक पवार, विजय चिवकर, मनोज मुणगेकर, दशरथ मुणगेकर, संतोष मुणगेकर, चंद्रकांत मुणगेकर, विनया मुणगेकर, कणकवली तालुका अध्यक्ष महेंद्र मुणगेकर तसेच जिल्हा युवा प्रमुख प्रकाश वाबकर यांच्यासह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचे उपस्थितांनी अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. देवगड तालुक्यातील चर्मकार समाजाच्या संघटनात्मक व सामाजिक कार्याला नव्या कार्यकारिणीमुळे अधिक बळ मिळेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.