ओरोस : भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या निवासस्थानी श्री गणरायाचे खा. नारायण राणेंनी घेतले दर्शन

शेअर करा

ओरोस,दि.१९ सप्टेंबर

भारतीय जनता पार्टीचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या ओरोस येथील निवासस्थानी विराजमान झालेल्या श्री गणरायाचे माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांनी मनोभावे दर्शन घेतले.यावेळी त्यांच्यासमवेत पत्नी निलम राणे उपस्थित होत्या.

यावेळी खासदार नारायण राणे यांनी श्री गणरायाची दर्शन घेत गणरायाच्या चरणी प्रार्थना करताना जिल्ह्यातील नागरिकांसह सर्वांच्या सुख-समृद्धीसह उत्तम आरोग्य लाभावे, अशी मनोकामना व्यक्त केली.

गणेशोत्सवाच्या निमित्ताने सावंत यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते. यावेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच सावंत कुटुंबीय उपस्थित होते. गणरायाच्या दर्शनानंतर सावंत परिवाराच्या वतीने खा.राणे यांचा सत्कार करण्यात आला.

शेअर करा