तातडीने दरडीचा मलबा हटवण्याचे काम सुरु, तीन तासात वाहतूक पूर्ववत होण्याची शक्यता
फोंडाघाट,दि.२८ जून(संजय सावंत)
संध्यकाळ पासून सुरू फोंडाघाट परिसरात होत असलेल्या जोरदार संततधार पावसामुळे नेहमीच वाहतुकुसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या फोंडाघाटात घाटाच्या मध्यवर्ती भागात आज रात्री ८. ३० वा. च्या दरम्यान दरड कोसळल्याने दर्डीचे दगड, मलबा,माती रस्त्यावर पसरून फोंडाघाट हून कोल्हापूर च्या दिशेने जाणारी येणारी वाहतूक पूर्णतःहा बंद झाली.मात्र याच रस्त्यावरील देवगड ते दाजीपूर रस्त्याचे कॉंक्रिटीकरण काम करणाऱ्या निखिल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या यंत्रणेने तातडीने जेसीबी च्या साहाय्याने दरडीचा मलबा बाजूला करण्याचे काम तत्परतेने हाती घेतले असून त्यांच्या म्हणण्यानुसार साधारणता तीन तासात रस्ता मोकळा होईल सांगण्यात आले