फोंडाघाट : विद्यानिकेतन स्कूल कसालचा शिष्यवृत्ती परीक्षेत वेदक विनय खोचरे राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्ती जिल्ह्यात 6वा व तालुक्यात द्वितीय

शेअर करा

फोंडाघाट, दि. ०७ जुलै (संजय सावंत)


महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत दिनांक 22 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता 5वी व 8वी शिष्यवृत्ती परीक्षेत अनंत स्मृती चॅरिटेबल ट्रस्टच्या विद्या निकेतन स्कूल कसाल या शाळेने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. इयत्ता 8वीतील वेदक विनय खोचरे यांने 80.53 गुणासहित राष्ट्रीय ग्रामीण शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यात 6वा व तालुक्यात द्वितीय क्रमांक मिळवून यश संपादन केले आहे. तर याच प्रशालेचा 8वीतील विद्यार्थी वरद सलील प्रभू. यांने सर्वसाधारण ग्रामीण शिष्यवृत्तीमध्ये जिल्ह्यात तृतीय क्रमांक मिळविला. या प्रशाले तून इयत्ता 8वी तील 12 विद्यार्थी परीक्षेकरता प्रविष्ट. झाले होते. त्यापैकी 2 विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक व 5 विद्यार्थी पात्र ठरले . इयत्ता 5वीतील, 13 विद्यार्थी प्रविष्ट झाले होते. व त्यातील 2 विद्यार्थी पात्र ठरले.

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, संस्थेचे अध्यक्ष, सीईओ, व पालक यांनी मनःपूर्वक अभिनंदन केले असून, पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

शेअर करा