रत्नागिरी मांडवी समुद्रकिनाऱ्यावर भाजपाची स्वच्छता मोहीम

शेअर करा

आमदार प्रमोद जठार स्वच्छता मोहिमेत सहभागी

‘स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर रत्नागिरी’ स्वच्छता मोहिमेतून पर्यावरण संवर्धनाचा संदेश

रत्नागिरी,दि.२६ सप्टेंबर

भारतीय जनता पार्टी रत्नागिरीच्या वतीने आज रत्नागिरीतील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जनानंतर अस्वच्छ झालेल्या समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता करण्यासाठी भाजपा पदाधिकारी, महिला, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले.

या स्वच्छता मोहिमेत आमदार प्रमोद जठार यांनी प्रत्यक्ष सहभागी होत समुद्रकिनाऱ्याची स्वच्छता केली. गणेश विसर्जनानंतर निर्माण झालेला कचरा आणि इतर अस्वच्छता दूर करत समुद्रकिनारा स्वच्छ व सुंदर ठेवण्याचा संदेश यावेळी देण्यात आला.

या मोहिमेला भाजपा जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, जिल्हा उपाध्यक्ष राजेश भाटलेकर, जिल्हाध्यक्ष वर्षा ताई ढेकणे, मंडल अध्यक्ष दादा ढेकणे यांच्यासह भाजपा पदाधिकारी, महिला कार्यकर्त्या, महाविद्यालयीन विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

‘स्वच्छ समुद्रकिनारा, सुंदर रत्नागिरी’ या भावनेतून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.

शेअर करा