सावंतवाडी,दि. १७ ऑगस्ट
आजगाव येथील श्री देव वेतोबा वार्षिक हरिनाम सप्ताहाला गुरुवारपासून भक्तिमय वातावरणात सुरुवात झाली असून ,या सप्ताहानिमित्त मंदिर परिसरात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, भाविक भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत श्री देव वेतोबाचे दर्शन घेत आहेत.यामुळे मंदिर परिसर हरिनामाने दुमदुमून गेल आहे.
उद्या मंगळवार आजगाव भोमवाडी येथील खास दिंडी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या दिंडीमध्ये मोठ्या संख्येने भाविकांनी सहभागी व्हावे असे आवाहन मंदिर समिती तसेच ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे, या दिंडी सोहळ्यामुळे परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे.
तसेच विविध धार्मिक कार्यक्रम, हालते देखावे ,यामुळे हरिनाम सप्ताहाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून भाविकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. या हरिनाम सप्ताह सोहळ्याची सांगता येत्या गुरुवारी होणार आहे.