सावंतवाडी,दि.२१ ऑगस्ट
भारतीय जनता पार्टी सिंधुदुर्ग जिल्ह्याची ओबीसी मोर्चा जिल्हा कार्यकारिणी नुकतीच घोषित करण्यात आली आहे. या नव्या कार्यकारिणीमध्ये सावंतवाडी शहर भाजप ओबीसी मोर्चाच्या मंडळ अध्यक्षपदी श्री. धीरेंद्र म्हापसेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
भाजपचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या हस्ते म्हापसेकर यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले. ही नियुक्ती सिंधुदुर्ग ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष छोटू पारकर यांच्याकडून करण्यात आली आहे. धीरेंद्र म्हापसेकर यांच्या निवडीबद्दल भाजपचे स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि समर्थकांनी त्यांचे अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.