सावंतवाडी : गोवा कृषी विभागाच्या शेतकरी अभ्यास दौऱ्यात होडावडा येथील माणगावकर यांच्या बागेला भेट

शेअर करा

गांडुळखत, बकरीपालन, कुक्कुटपालन, रक्षक सापळे व चमकणारी अळंबीबाबत मंगेश माणगावकर यांनी दिली सविस्तर माहिती

सावंतवाडी,दि. १९ ऑगस्ट

विभागीय कृषी कार्यालय, म्हापसा आणि आत्मा नॉर्थ गोवा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या बार्देश तालुक्यातील महिला व पुरुष शेतकऱ्यांसाठी आंतरराज्य अभ्यास दौऱ्यानिमित्त वेंगुर्ला तालुक्यातील होडावडा गावातील मंगेश माणगावकर यांच्या बागेला भेट देण्यात आली. यावेळी माणगावकर यांनी गांडुळखत,बकरी पालन, कुक्कुटपालन,रक्षक सापळे,चमकणारी अळंबी याबद्दल सविस्तर माहिती दिली.

तसेच शेतकऱ्यांना शेतात किड नियंत्रण करून मदत करणाऱ्या बेडकांच्या संवर्धनाचे महत्व सांगितले.आणि बागेतील विविध जातींच्या बेडकांची माहिती दिली.तसेच शेतकरी बांधव खास करून महिला वर्गासाठी घरगुती पद्धतीने स्वस्तात बनणारे कृत्रिम अंडी उबवणूक पेटी तयार करण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.शेवटी शासनातर्फे उपयुक्तता सांगितलेल्या गोकृपा अमृतम् चे प्रात्यक्षिक दाखवून त्याचे महत्व समजावून सांगण्यात आले. यावेळी अधिकारी
सौ. पूजा महालकर(BTM,ZAO –म्हापसा) यांनी शासनाच्या विविध योजनांची माहिती उपस्थितांना दिली. तसेच शंकांचे निरसन केले. यावेळी एकूण २६ शेतकरी महिला आणि पुरुषांनी बागेतील उपक्रमांची माहिती घेतली.आणि आपला उस्फुर्त सहभाग दर्शवला.

शेअर करा